सातपुड्यात उमटू लागला ढोल व होळी गीतांचा सुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:29 IST2020-03-01T12:29:33+5:302020-03-01T12:29:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघ्या भारतात फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होत असली तरी सातपुड्यातील आदिवासींमध्ये माघ अमावास्येपासूनच होळीपर्व ...

सातपुड्यात उमटू लागला ढोल व होळी गीतांचा सुर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवघ्या भारतात फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होत असली तरी सातपुड्यातील आदिवासींमध्ये माघ अमावास्येपासूनच होळीपर्व सुरू झाले. परंपरेनुसार यंदाच्या अमावास्येला सातपुड्यातील प्रत्येक गावपंचायतीने नियोजित पुजाऱ्यांमार्फत होळीसाठी गोवºयासह सागाचा दांडा रोवला. अमावास्येपासून महिला-मुलींमध्ये होळीगीत व लोलगीतांचा सुर उमटू लागला.
अमावास्येला दिसलेल्या नव्या चंद्रदेवतेचे दर्शन घेऊन होळीदेवतेची पथ्ये पाळणाºया (होळीनृत्य पथकातील कलाकार) मोरखी, बावा, ढाणका डोकोअं, तीर-कामठाधारी मोरावाला यांनी व्रत (पालनी) सुरू केले. या कालावधीत त्यांना मासांहार वर्ज्य असते. महिला व महिलांच्या कुठल्याही कपड्यांना स्पर्श न करणे शिवाय खाट-खुर्ची, चप्पलांचा त्यागही करावा लागतो. आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ कपडे परिधान करणे, दगड फेकुन मारणे, अपशब्द उच्चारणे अशा बाबी देखील टाळत आहे. आदिवासींचा होळी हा एकमेव सण असून तो केवळ एका दिवसात साजरा होत नाही, एक-एक करीत महिनाभर साजरा होणारा हा उत्सव आहे.
सातपुड्यातील आदिवासींच्या ताब्यात केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतीच असल्याने रोजगाराचा नेहमीच वानवा असते. पावसाळा संपल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात बहुसंख्य आदिवासी रोजगारानिमित्त परप्रांतात स्थलांतर झाले, घर व गाई-गुरांच्या देखभालीसाठी कुटुंबातील लहान मुलं-बाळंच मूळगावी राहिले होते. होळीनिमित्त तब्बल सहा महिन्यांनी गावी परतले असून ओस पडलेली सातपुड्यातील गावे माघ महिन्यातच गजबजली आहे. हे सर्व बांधव सामुहिकपणे होलीकोत्सवाची तयारी करीत आहे.
आदिवासी संस्कृतीचे प्रतिक ठरणारे ढोल एकाच गावातील होळीत तब्बल १०० पेक्षा अधिक दाखल होत असून चांगला, सुरेल, मधूर पण सर्वोच्च आवाज असणाºया ढोल मालकाला सर्वोच्च मान दिला जातो. शिवाय निवडक ढोल मालकांना क्रमानुसार बक्षिसेही दिली जातात. त्यामुळे ढोल नव्याने तयार झाले आहे. तर सर्व जुन्या ढोलची पुनर्बांधणी झाली आहे. ढोल वादक देखील अनेक दिवसापासून सराव करीत आहे. ही गीते सातपुड्यातील आदिवासींना सुखसमृद्धीचा संदेश देत आहे. व्रत पाळणाºया कलाकारांनी देखील त्यांना लागणाºया साहित्यांची जुडवा-जुडव करीत सहभाग नोंदवित आहे.