शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काही दिवसांपासून पाऊस बंद असला तरी पावसाचे वातावरण कायम राहिले आहे, त्यामुळे  पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्गम भागात पावसाच्या धाकातच मळणीची कामे सुरू आहे. अचानक पाऊस सुरु झाल्यास तातडीने शेतमाल झाकता यावा यासाठी दुर्गम भागातील काही शेतक:यांनी धावपळ करीत प्लॅस्टिकवर मळणी सुरू केली आहे.दुर्गम भागात प्रतीकुल भौगोलिक परिस्थीतीमुळे नगदी पिके घेतली जात नसून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अन्न-धान्याचीच पिके घेतली जात आहे. त्यात ज्वारी, मका, उडीद,भात व भगरवर्गिय सहा-सात प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. परंतु या अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिके सडल्याने नुकसान झाले. जी पिके हाती आली ती पिकेही पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याने                      धोक्यात सापडली आहे. हातातली पिके वाचविण्यासाठी धडगाव व मोलगी भागातील शेतक:यांची धावपळ सुरू आहे. धडगाव तालुक्यातील वेलीआंबा, चिंचकाठी, उखळीआंबा, काकरपाटी, पिंपळबारी तर अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, काठी, चनवाई या परिसरातील शेतक:यांनी मळणीच्या कामांना सुरूवात केली आहे. तर सुरवाणी, खांडबारा, खडक्या, मोजरा, कुंडल, खुंटामोडी या परिसरातील शेतक:यांनी भात पिकाच्या               मळणीवर भर दिला आहे. परंतु आजही पावसाचे वातावरण कायम राहिल्यामुळे शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दुर्गम भागात पिके मळणीसाठी मोठ-मोठी तथा कायमची खळे तयार  करण्यात आली आहे. सर्व खळे मळणीसाठी सुस्थितीत असतानाही केवळ पावसाच्या  भितीमुळेच  प्रत्येक शेतक:यांकडून प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यास तातडीने खळ्यातला शेतमाल व मळणी सुरू असलेली पिके झाकता यावी म्हणून प्लॅस्टिकवर मळणीची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरलेली पिके तरी सुरक्षीत राहती अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

घास हिरावलापावसावर अवलंबून असलेली शेती करणा:या दुर्गम शेतक:यांची पिके अतिवृष्टीनंतर अवकाळी पावसाने हिरावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असल्याचे सांगण्यात येत आहे.