शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

बालकांपेक्षा पालकांवरच दुप्पट खर्च

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: August 18, 2017 12:02 PM

कुपोषण मुक्तीचा असाही फंडा : ग्राम बालविकास केंद्रांमधील चित्र

ठळक मुद्दे बालकांवर दिवासाला 55 तर पालकांवर होणार 105 रुपये खर्च जिल्ह्यात 1,674 सॅम बालके 4कुपोषणाच्या दोन श्रेणीनुसार बालकांचे कुपोषणाचे प्रमाण ठरविले जाते. पूर्वी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी श्रेणी ठरविली जात होती. आता केवळ सॅम आणि मॅम या नुसारच तीव्र व सामान् 78 केंद्रांचे पहिल्या टप्प्यात नियोजन जिल्ह्यात यंदा जवळपास दिडशे ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ही केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये सॅम बालकांना 30 दिवस ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी आठ वाजपहिल्या टप्प्यातील 78 केंद्रांना दोन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. दुस:या टप्प्यात देखील तेवढीच बालविकास केंद्र मंजुर होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा ुउपलब्ध राहणार आहेत. -अशोक बागुल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महि

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टनंदुरबार : कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रात भरती होणा:या कुपोषीत बालकावर दिवसाला 55 रुपये तर त्याला आणणा:या पालकावर 105 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे कुपोषण बालकाचे कमी होईल की पालकाचे हा संशोधनाचाच विषय ठरणार आहे.          जिल्ह्यात विशेषत: धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कुपोषीत बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे ज्या भागात सर्वाधिक कुपोषीत बालके आहेत त्या भागातील गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तब्बल दोन कोटी रुपये खर्चास देखील मान्यता दिली आहे. असा होईल खर्चग्राम बालविकास केंद्रात बालकाला आणल्यानंतर त्याला विशिष्ट आहार, पोषक औषधी दिली जातील. एका दिवसाला या माध्यमातून बालकावर 55 रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. या बालकाला जो पालक अर्थात आई किंवा वडिल यापैकी एकजण घेवून येईल त्याला त्याची बुडीत मजुरीपोटी त्याला 85 रुपये रोज आणि एक वेळ जेवनाचा भत्ता म्हणून 25 रुपये दिले जाणार आहेत. अर्थात बालकावर 55 रुपये तर त्याच्या पालकावर 105 रुपये खर्च होणार आहे. बालकापेक्षा पालकावर 50 रुपये जादा खर्च राहणार आहे.केंद्रात बालकांना सुविधाग्राम बालविकास केंद्रात बालके ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेर्पयत अर्थात दिवसातले दहा तास राहणार असल्यामुळे या ठिकाणी बालकांसाठी पाळणा, लहान खेळणी राहणार आहेत. अंगणवाडी केंद्राच्या परिसरातच ही बालविकास केंद्र राहणार असल्यामुळे स्वच्छतागृहे आणि पाण्याचेही व्यवस्था अशा ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. दर आठ दिवसांनी या बालकांचे वजन घेतले जाते.केवळ औपचारिकता नकोग्राम बालविकास केंद्रांची जिल्ह्यात केवळ औपचारिकता राहू नये. गेल्या काही वर्षातील तो अनुभव आहे. अंगणवाडी केंद्रात दिवसभर बालकांना ठेवले जाते. त्यांचे पोषण किती आणि कसे होते हा संशोधनाचा विषय असतो. परंतु कागदपत्र रंगविले जावून सर्वच अलबेल दाखविले जाते.