शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अनुदानाअभावी घरकुलाची कामे रखडली : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:20 PM

तिस:या हप्त्याची रक्कम वर्षभरापासून प्रलंबित

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : गेल्या वर्षापासून रखडलेल्या घरकुलाच्या तिस:या हप्त्याचा रक्कमेसाठी तालुक्यातील  सरपंचांनी सोमवारी गटविकास अधिका:यांना साकडे घालत तातडीने रक्कमेची शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. दरम्यान पैशांअभावी घरकुलांची कामेही रखडल्याची लाभाथ्र्याची व्यथा आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात सन 2016-2017 मध्ये साधारण एक हजार 238 घरकुले  मंजूर करण्यात आली होती. ग्रामसभांच्या ठरावानुसार ही सर्व घरकुले संबंधीत लाभाथ्र्याना वितरित करण्यात आली आहे. एक लाख 20 हजार रुपये केंद्र सरकारचे तर 18 हजार रुपये मनरेगातून असे एकूण एक लाख 38 हजार रुपयांचे घरकुल आहे. संबंधीत लाभाथ्र्याची घरकुलासाठी निवड झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची ऑनलाईन माहिती या विभागाने नेमलेल्या यंत्रणेकडे पाठविण्यात आली. शिवाय शासनाने घरकुल बांधकामासाठी पहिला व दुसरा हप्ता नियमानुसार लाभाथ्र्याना दिला आहे. ही रक्कम व आपल्याजवळ असलेल्या रक्कमेतून त्यांनी घरकुलांचे काम लेन्टर लेव्हलर्पयत पूर्ण केली आहे. तथापि पुढील रक्कमे अभावी घरकुलाच काम गेल्या वर्षापासून रखडले आहे. पैशांसाठी सातत्याने ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांकडे हेलपाटे मारीत आहेत. वास्तविक शासनाच्या नियमानुसार म्हणजे टप्या टप्प्यांनी लाभाथ्र्यानी घरकुलाचे काम केले आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या बांधकाम यंत्रणेनेदेखील घरकुलाचे टप्प्यानुसार मूल्यमापन करून अहवाल दिला आहे, असे असतांना या लाभाथ्र्याना अजूनही घरकुलाची रक्कम मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे शासनाने घरकुलाच्या रक्कमेत समाधानकारक वाढ केल्याबरोबरच लाभाथ्र्याकडून एका वर्षात घरकुल पूर्ण करून घेण्यावर भर देत आहे तर दुसरीकडे शासनाचीच वरिष्ठ यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्याबाबत उदासिन धोरण अवलंबवत असल्याचा लाभाथ्र्याचा आरोप आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून याप्रकरणी माहिती घेतली असता सन 2016-2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांपैकी 700 लाभाथ्र्याना तिस:या हप्त्याची रक्कम देण्यात आली अहे. अजून 500 लाभाथ्र्याना रक्कम मिळालेली नाही. त्यांची जी ओ टॅगींग नुसार माहिती जनरेट करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या खात्यावर अजून रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक यातील बहुतेक लाभाथ्र्यानी शासनाकडून घरकुलाचा पैसा मिळेल या आशेवर उधार-उसनवार पैसे           घेवून घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. मात्र पैशांसाठी आता सावकार         तगादा लावत आहे. साहजिकच लाभार्थी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. घरकुल योजनेतील दलाली थांबवून त्याचात पारदर्शकता आणण्याचा शासनाचा चांगला हेतू असला तरी निधी थेट लाभाथ्र्याना देण्याबाबत सुद्धा तत्परता दाखविण्याची लाभाथ्र्याची अपेक्षा आहे. पैशांसाठी वैतागलेल्या लाभाथ्र्याची कैफीयत ऐकूण तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाडवी, मोरवडचे सरपंच प्रविण वळवी, शानु वळवी, यशवंत पाडवी, चंदन पाडवी, भिकलाल वळवी, अरूणाबाई पाडवी, विनोद पाडवी, उषाबाई गावीत, मंगलाबाई पावरा आदी सरपंचांनी सोमवारी गटविकास अधिकारी मंगला खर्डे यांची भेट घेवून घरकुलाच्या निधीबाबत विचारणा केली होती. पैशांअभावी अनेकांची घरकुले रखडली आहेत. काहींनी उधार-उसनवारीने पैसे घेऊन घरकुले कपबशी पूर्ण केली आहेत, अशी कैफीयत अधिका:यांपुढे मांडून तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. याप्रकरणी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे लवकरच लाभाथ्र्याना पैसे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले, असे असले तरी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन संबंधीत लाभाथ्र्याना घरकुलाची थकीत रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिका:यांनी केली आहे.