शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

जिल्ह्याला जास्तीत जास्त रेमडीसीवर मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही भाग डोंगराळ आणि दुर्गम असतानादेखील येणाºया अडचणींवर मात करून मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा चांगले प्रयत्न करते आहे, असे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून त्यामुळे कोरोना साखळी खंडीत करण्यास मदत होत आहे. बाधित व्यक्तींचा चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यात लवकरच आॅक्सिजन प्लँटचे काम सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक भाषेचादेखील उपयोग प्रभावी ठरला आहे. रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. आदिवासी विभागामार्फतदेखील रुग्णवाहिका घेण्यात येणार असून शासनानेदेखील त्यासाठी व रेमडीसीवर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १९ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तर एक लाख १६ हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी आरोग्य सुविधेसाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात ९५ टक्केपेक्षा जास्त चाचण्या आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून होत आहे. आठ खाजगी ठिकाणी कोरोना उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात २०० बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती त्यांनी दिली.