शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

१२४ फरार आरोपींना जिल्हा पोलिसांनी वर्षभरात केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा पोलिसांनी वर्षभरात तब्बल १२४ फरार आरोपींना जेरबंद केले. यात अनेक कुख्यात फरार आरोपींचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलिसांनी वर्षभरात तब्बल १२४ फरार आरोपींना जेरबंद केले. यात अनेक कुख्यात फरार आरोपींचा देखील समावेश आहे. यासाठी वेळोवेळी ६५ पोलीस कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथके स्थापन करण्यात आली होती.जिल्ह्यात पाहिजे व फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष मोहिम सुरू केली होती. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षीत देखील करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, त्या त्या भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या पर्यवेक्षणाखाली सर्व पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, पाच कर्मचारी असे १३ पोलीस अधिकारी व ६५ पोलीस कर्मचाºयांचा त्यात समावेश होता.पोलिसांनी राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, पंढरपूर, धुळे या भागासह मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये जावून संशयीतांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.अनेक गंभीर गुन्ह्यातील असलेले हे आरोपी फरार असल्यामुळे न्यायलयीन कामकाजात देखील आडकाठी येत होती. त्यामुळे अशा आरोपींना पकडून त्यांना न्यायालयासमोर उभे करून संबधीत गुन्ह्याची केस चालवावी यासाठी ही मोहिम राबविण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांच्या गुन्ह्यातील कडक शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात संबधीत गुन्ह्यातील ठोस कागदपत्रे, पुरावे व साक्षी सादर केल्या जाणार आहेत.ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी, हर्षल बागल, प्रवीण पाटील, राजेश पाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी केली.पोलिसांनी जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या काळात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन, दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आठ, घरफोडीच्या गुन्ह्यातील एक, चोरीच्या गुन्ह्यातील पाच, दंगलीच्या गुन्ह्यातील ३९, खंडणीच्या गुन्ह्यातील दोन, फसवणुकीच्या गुन्ह्यातील ६० आरोपींसह विविध कलमान्वये दाखल असलेल्या इतर गुन्ह्यातील सहा आरोपींचा त्यात समावेश आहे. यामुळे इतरही फरार आरोपींचे धाबे दणाणले आहे.