अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची जिल्हा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:27+5:302021-09-10T04:37:27+5:30

नंदुरबार : आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री ...

District meeting of NCP in the presence of Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची जिल्हा बैठक

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची जिल्हा बैठक

नंदुरबार : आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करून पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या नंदुरबार जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. अभिजित मोरे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हा निरीक्षक नाना महाले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, बबलू कदमबांडे, मोहन शेवाळे यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डाॅ. अभिजित मोरे यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करून त्यासाठी बूथ कमिट्या करणे व इतर संघटन बांधणीसंदर्भातील सूचना केल्या. तसेच नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासाठी स्वतंत्र भवन बांधून देण्याबाबत आश्वासन देऊन त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या.

Web Title: District meeting of NCP in the presence of Ajit Pawar