जिल्ह्याला ओल्या दुष्काळाची किनार तरीही वाढीव पैसेवारीचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:53 IST2019-11-03T12:53:03+5:302019-11-03T12:53:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच ...

जिल्ह्याला ओल्या दुष्काळाची किनार तरीही वाढीव पैसेवारीचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात तीन वर्षापासून निर्माण झालेला दुष्काळ जावून सुकाळ परतल्याचे चित्र निर्माण झाले आह़े परंतू याला सप्टेंबर अखेरीस झालेल्या अतीवृष्टीचीही किनार असल्याने शेतकरी ओल्या दुष्काळाला सामोरे जात असल्याचेही चित्र जिल्ह्यात आह़े
प्रशासनाने नुकतेच हंगामी पैसेवारी जाहिर केली आह़े यात नंदुरबार तालुक्यातील 145, नवापुर 165ख तळोदा 94, शहादा 160, धडगाव 99 तर अक्कलकुवा तालुक्यातील 194 गावे ही सुस्थितीत असून या प्रत्येक गावातील शिवारात पिकांची स्थिती मजबूत असल्याने पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे घोषित झाले आह़े नजर पैसेवारीतही हीच स्थिती होती़ यातून प्रशासनाने आढावा घेत हंगामी पैसेवारी घोषित केली आह़े येत्या डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारीची आकडेवारीही कायम राहिल असा अंदाज बांधला जात आह़े परंतू सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 19 हजार बाधित शेतक:यांच्या भरपाईबाबत कारवाईच झालेली नसल्याने त्यांच्यावर ओल्या दुष्काळाची कु:हाड कोसळणार आह़े कोरड क्षेत्रात 12 हजार 991 शेतक:यांच्या 7 हजार 440 तर 7 हजार 164 बागायतदार शेतक:यांच्या 5 हजार 661 शेतीपिकांना अतीवृष्टीची झळ बसली होती़ या पिकांचे पंचनामे पूर्ण करुन शासनाकडे भरपाईच्या 42 कोटी रुपयांचा प्रस्तावही देण्यात आला आह़े परंतू त्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याने शेतकरी नुकसानीच्या गर्तेत आहेत़ यातून मार्ग निघत नसल्याने शासनाने जाहिर केलेल्या पैसेवारीवर समाधान करण्याऐवजी शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत़
857 खरीप आणि 30 रब्बी गावांचा आढावा प्रशासनाने घेतला आह़े अद्याप अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात आलेली नसल्याने पुढील कारवाई बाकी आह़े जिल्ह्यात अतीवृष्टीबाबत झालेल्या पंचनाम्यांबाबत शेतक:यांनी तक्रारी केल्या होत्या़ शेतक:यांनी सांगूनही त्यावेळी तलाठी व मंडळाधिकारी यांनी पंचनामे न केल्याने अनेकांना भरपाईपासून मुकावे लागण्याची शक्यता आह़े यामुळे जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा आढावा पुन्हा नव्याने घेऊन भरपाईचे नवीन प्रस्ताव देण्याची मागणी करण्यात येत आह़े