पाणी नमुने तपासणीत जिल्हा पुन्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:04 IST2020-09-12T12:04:11+5:302020-09-12T12:04:20+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची जैवरासायनिक तपासणी करण्यात आली आहे. ...

पाणी नमुने तपासणीत जिल्हा पुन्हा अव्वल
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची जैवरासायनिक तपासणी करण्यात आली आहे. सर्वच स्त्रोतांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करणाऱ्या जिल्ह्यात नंदुरबार अव्वल ठरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांमध्ये टीडीएसचे प्रमाण नवापूर तालुक्यातील काही स्त्रोत वगळता इतर ठिकाणी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पिण्याच्या दुषीत पाण्यामुळे विविध आजार होतात. टीडीएस जास्त असल्यास हाडांचे आजार होत असतात. त्यामुळे त्या त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी वर्षातून दोन वेळा करणे आवश्यक असते. त्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे पाणी नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात येते. मान्सून पूर्व तपासणीत जिल्ह्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जलस्त्रोतांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते. या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अशा स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी केली जाते. असे पाण्याचे स्त्रोत लागलीच कळावे यासाठी त्यांचे डिजीटायलेझशन अर्थात जिओ टॅगींग करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात ५९१ ग्रामपंचायतीअसून एकुण साडेआठ हजारापेक्षा अधीक पाणी स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणाहून किंवा स्त्रोताहून गाव, पाड्यातील नागरिक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात ते अधिकृत स्त्रोत मानले जाते. त्यामुळे अशा स्त्रोतांची गाव, पाडे आणि दºयाखोºयात जावून निश्चिती करण्यात आली. त्यांची एकुण संख्या ८,६४४ इतकी आहे.
या सर्व स्त्रोतांचे अक्षांश, रेखांश निश्चिती करून त्याचे डिजीटलायझेशन करण्यात आले. अॅप व वेबसाईटद्वारे ते सहज पहाता येते. सर्वच पाण्याच्या स्त्रोतांचे डिजीटलायझेशन करणारी नंदुरबार जिल्हा परिषद ही राज्यात एकमेव ठरली. विशेष म्हणजे ही माहिती कायमस्वरूपी राहणार असल्याने गावातील जुन्या झालेल्या योजनांसह स्त्रोतांवर सांकेतांक रंगवून क्रमांक दिला गेला आहे. यात हंगामी, बारमाही व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. इतकेच नाही तर स्त्रोतांपासून ते जलकुंभापर्यंत गेलेल्या वितरण नलीकेचे सर्वेक्षण झाले आहे.
जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांमध्ये टीडीएसचे प्रमाण अत्यल्प दिसून आले आहे. नवापूर तालुक्यातील काही स्त्रोतांमध्ये हे प्रमाण आहे. पंरतु ते अल्प प्रमाणात असल्यामुळे पाणी पिण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नमुन्याचे अणुजैविक व रासायनिक विश्लेषण संबधीत तालुक्याच्या उपविभागीय प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यामुळे वेळ व खर्च देखील वाचतो. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पहाता विहिरी आणि कुपनलिकांद्वारेच पाणी पुरवठा अधीक केला जातो.
दरम्यान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यंदाही राज्यात चांगले काम केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जीओ टॅगींगसह इतर कामे करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यात एकुण आठ हजार ६४४ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. या सर्व स्त्रोतामधील नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी सहा हजार ७३८ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील जवळपास सर्वच नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली. त्याचे प्रमाण हे १०० टक्के आहे.
नवापूर तालुक्यातील एकुण स्त्रोतापैकी १५ टक्के स्त्रोतात टीडीएसचे प्रमाण आढळून आले आहे. टीडीएस असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
जिल्ह्यातील ५९१ पैकी केवळ सहा ग्रामपंचायतींच्या पाणी स्त्रोताला येलो कार्ड देण्यात आले आहे. ५८५ ग्रामपंचायतींच्या स्त्रोतांना ग्रीन कार्ड देण्यात आले आहे. रेडकार्ड धारक एकही ग्रामपंचायत जिल्ह्यात नाही.
जिल्ह्यात पाणी नमुने तपासणीच्या एकुण सहा प्रयोगशाळा आहेत. त्यात जिल्हास्तरावर दोन तर तालुका स्तरावर चार प्रयोगशाळा आहेत.