मक्याचे भाव घसरल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:14+5:302021-01-19T04:33:14+5:30

नाशिक जिल्हात मक्याचे उत्पादन अधिक झाल्याने त्याचा काहीसा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील मका खरेदीवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

Dissatisfied with falling maize prices | मक्याचे भाव घसरल्याने नाराजी

मक्याचे भाव घसरल्याने नाराजी

नाशिक जिल्हात मक्याचे उत्पादन अधिक झाल्याने त्याचा काहीसा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील मका खरेदीवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात अवकाळी पावसाने मक्याची गुणवत्ता काही प्रमाणात खराब झाल्याने मागणी वाढत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून पक्ष्यांना खाद्य म्हणून मक्याची खरेदी केली जात होती. मात्र, यावर्षी या व्यवसायावर बर्ड फ्लू सावट असल्याने मका खरेदीवर परिणाम जाणवत आहे. पांढऱ्या मक्याला बाजारात १५००ते १८०० रुपये एवढा दर मिळत आहे. पांढरा मका पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याने त्याला चांगली मागणी वाढली आहे.

कापड उद्योगातही कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी मक्याची भुकटी करुन वापरली जाते. सोयाबीनची पेंड तयार करण्यासाठी, अल्कोहोल निर्मिती, पशुखाद्यासह कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून मक्याला मोठी मागणी असते. नंदुरबार जिल्ह्यातून सीमेलगतच्या राज्यात दरवर्षी मक्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यंदा मक्याला पुरेशी मागणी नसल्याने व अवकाळी पावसाने खरेदी केलेला माल गोदामात खराब होत असल्याने जिल्ह्यातील व्यापारी मका खरेदी करण्यासाठी धजावत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून मक्याची होणारी खरेदीही मंदावली आहे. त्यामुळे दर २०० ते २५० रुपयांनी खाली आले आहेत. कुक्कुटपालन करणाऱ्यांकडून मक्याला ९०० ते एक हजार १०० रुपये प्रतिक्विंटल एवढ्या दराने मागणी होत आहे. गेल्यावर्षी पोल्ट्री व्यावसायिकांकडून एक हजार ८०० रुपयांपर्यंत दुय्यम प्रतीचा मका विकत घेतला जात असताना यंदा चांगल्या प्रतीच्या मक्याला एक हजार १०० रुपये एवढाच दर मिळत असल्याने मका पीक उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Web Title: Dissatisfied with falling maize prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.