घरगुती वादातूून एकास बेदम मारहाण व तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:56 IST2019-08-16T12:55:56+5:302019-08-16T12:56:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : न्यायालयाच्या खटल्यात कमी रक्कम मिळाली, आणखी 15 हजार रुपये द्यावे या कारणावरून तिघांनी दुकानात ...

घरगुती वादातूून एकास बेदम मारहाण व तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : न्यायालयाच्या खटल्यात कमी रक्कम मिळाली, आणखी 15 हजार रुपये द्यावे या कारणावरून तिघांनी दुकानात घुसून तोडफोड करीत एकास बेदम मारहाण केली. शिवाय दुकानातील सामानाची तोडफोड करून 72 हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरून नेल्याची घटना नंदुरबारातील अंबिका कॉलनीत घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण पाटील, रावसाहेब पाटील व वाघसर असे संशयीतांची नावे आहेत. याबाबत राकेश हिंमतराव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, प्रवीण पाटील व रावसाहेब पाटील यांच्या नात्यातील मुलीचा न्यायालयात खटला चालू होता. त्या खटल्यात कमी रक्कम मिळाली. आणखी 15 हजार रुपये आताच द्यावे अशी मागणी तिघांनी केली. अंबिका कॉलनीतील किराणा दुकानात घुसून तिघांनी दुकानातील सामानाची नासधूस केली. राकेश पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. दुकानाच्या गल्ल्यातील दोन हजार रुपये रोख आणि 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन असा एकुण 72 हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार क्षिरसागर करीत आहे.