शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शेल्टी परिसरात रोगराईमुळे उसाचे पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शेतीचे नुकसान व शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच तालुक्यातील शेल्टी, पळसवाडा, ...

कोरोनामुळे शेतीचे नुकसान व शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच तालुक्यातील शेल्टी, पळसवाडा, वर्ढेटेंभे, बिलाडी, बामखेडा, नांदरखेडा या परिसरात शेकडो एकर क्षेत्रातील उस पिकावर पांढरी माशी, मावा, चिक्की आदी रोगराई पसरू लागली आहे.त्यामुळे उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकरी चिंतीत आहेत. उसाच्या पानांवरील किटक अंगावर येत असल्याने मजुरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. फवारणी करण्यासाठी मजूरही नकार देत आहेत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा भविष्यात कापूस, पपई या पिकांनाही हानीकारक ठरू शकतो. याबाबत शेतकऱ्यांनी परिसरात असलेल्या साखर कारखान्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती द्यावी व या रोगराईपासून पीक कसे मुक्त होईल याबाबत त्वरित मार्गदर्शन करून उसाचे उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

शेल्टी, ससदे परिसरात उसाच्या पानांवर पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. परिसरातील साखर कारखाने व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांचा ऊस वाचवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे.

-किशोर रामू पाटील, शेतकरी, शेल्टी, ता.शहादा