शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

२२० कोटींच्या वाढीव तरतुदीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने त्या अनुषंगाने कामे करण्यासाठी, योजना राबविण्यासाठी वाढीव २२० कोटींची तरतूद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने त्या अनुषंगाने कामे करण्यासाठी, योजना राबविण्यासाठी वाढीव २२० कोटींची तरतूद करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या विभागीय बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, आरोग्य आणि शिक्षणाचा निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्व संबधीत यंत्रणांनी प्रयत्न करावा, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिल्या.आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक उपयोजना २०२०-२१ साठी आयोजित नाशिक विभाग आढावा बैठक नाशिक येथे झाली. नंदुरबार जिल्ह्याच्या बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, संबधित प्रकल्प कार्यालयांचे अधिकारी आदी बैठकीस उपस्थित होते.आकांक्षित जिल्हा असल्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी २२० कोटीच्या वाढीव मागणीस मान्यता देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सादरीकरणात सांगितले.आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले, जिल्ह्याचा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील निर्देशांक वाढविण्याची गरज आहे. दुर्गम भागात रस्त्यांची सुविधा करणे तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिर योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांना देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लघु पाटबंधारे, कोल्हापूर बंधारे, प्राथामिक आरोग्य केंद्र, रस्ते, अमृत आहार, आणि अंगणवाडी बांधकामासाठी वाढीव मागणी त्यांनी सादर केली.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत वाढीव निधी व इतर योजनांसाठी प्राधान्यक्रमानुसार निधी देण्यात येईल, असे पाडवी यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी यांनी आश्रमशाळातील सुविधा व रस्ते दुरुस्ती संदर्भातील मागणी केली. यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यंदाच्या अतिवृष्टीत सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक फरशीपूल, मोठे पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. अद्यापही त्यांची अवस्था जैसे थे आहे. परिणामी दुर्गम भागात दळणळणाची मोठी समस्या आहे. ही बाब लक्षात घेता आदिवासी उपयोजनेतून या भागातील रस्ते दुरूस्ती, फरशी पूल आणि दरड कोसळलेले रस्ते दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्यासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली. मंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना सुचना देखील केल्या.