प्रकाशा येथे कोरोना लस घेणाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:38+5:302021-07-14T04:35:38+5:30

प्रकाशा येथे लस घेण्यासाठी येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्था नाही, पिण्यासाठी पाणी नाही, ऊन लागते म्हणून मंडप नाही, बसण्यासाठी बाक-खुर्च्या नाहीत. ...

Disadvantages of corona vaccine at Prakasha | प्रकाशा येथे कोरोना लस घेणाऱ्यांची गैरसोय

प्रकाशा येथे कोरोना लस घेणाऱ्यांची गैरसोय

प्रकाशा येथे लस घेण्यासाठी येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्था नाही, पिण्यासाठी पाणी नाही, ऊन लागते म्हणून मंडप नाही, बसण्यासाठी बाक-खुर्च्या नाहीत. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. येथे १८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाल्याने प्रकाशा व आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांची लस घेण्यासाठी दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. दररोज येणारे लसीचे १५० डोसही कमी पडू लागले आहेत. त्यामुळे येथे लसींचा पुरवठा वाढवून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. येथे सकाळी साडेनऊ वाजता लसीकरण सुरू होते. आरोग्य केंद्रासमोर एका खिडकीतून लसीसाठी नंबर लावावा लागतो. मात्र नंबर लवकर लागावा यासाठी नागरिक सकाळपासूनच गर्दी करतात. नागरिकांना ताटकळत रांगेतच उभे राहावे लागते. उभे राहून थकल्यावर दवाखान्याच्या गेटजवळ आजूबाजूला, मिळेल त्या ठिकाणी जागा करून खालीच बसावे लागते. त्यामुळे येथे बसण्याची जागा करावी व ऊन लागू नये म्हणून मंडप टाकण्याची मागणी होत आहे.

Web Title: Disadvantages of corona vaccine at Prakasha