शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

कोविड केंद्राला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यातील सौम्य लक्षण आढळून आलेल्या कोरोना विषाणू बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी व बाधितांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह तालुक्यातील सौम्य लक्षण आढळून आलेल्या कोरोना विषाणू बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी व बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यासाठी मोहिदा येथील शासकीय वसतिगृहात कोविड सेंटरचीनिर्मिती करण्यात आली आहे. मात्र येथील दुरवस्था पाहता हे उपचार केंद्र की, नरक यातना केंद्र असा प्रश्न सहजपणे पडतो. संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य, उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पीपीई किटची योग्य विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी अस्ताव्यस्त फेकून देणे, अशा अनेक प्रकारांनी येथे उपचार घेणारे बाधित रूग्ण त्रस्त झाले आहे.शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे २५३ अपेक्षा अधिक बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यापैकी १०० रूग्णांवर मोहिदा येथील कोविड सेंटरला उपचार सुरू आहे. शासकीय वसतिगृहातील चार इमारतींंपैकी एका इमारतीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यात आले असून, दुसरºया इमारतीत बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु अशाचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशा नागरिकांना ठेवण्यात आले आहे. उर्वरित दोन इमारतीमध्ये कोरोना बाधित अहवाल आला असला तरी काही रूग्णांमध्ये याची लक्षणे आढळून येत नाही तर काहींमध्ये सौम्य लक्षण आहे, अशा बाधितावर उपचार करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत या चारही इमारतीमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिकांना गेल्या दोन दिवसापासून ठेवण्यात आलेले आहे.येथे बाधित रूग्णाला उपचाराची सुविधा असली तरी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. विशेष म्हणजे बाधित रूग्णांवर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षिततेसाठी पीपीई कीट देण्यात आले आहे. ठराविक कालावधीनंतर या कर्मचाºयांनी शासकीय नियमानुसार हे कीट बदलणे अपेक्षित असून, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी असे जागतिक आरोग्य संघटना व शासनाचे आदेश असले तरी या सेंटरमध्ये या कर्मचाºयांकडून याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी होत नाही. वापर झाल्यानंतर या परिसरातील सार्वजनिक जागेवर एका ठिकाणी खुल्या वातावरणात हे कीट टाकले जात असून, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. दररोज किमान मोठ्या संख्येने कितीतरी कीट येथे पडले असून, वाºयामुळे संपूर्ण इमारतीच्या परिसरात पसरले आहेत.४दैनंदिन वापरानंतर संकलित होणारे मेडिकल वेस्ट याची नियमांनुसार विल्हेवाट लावणे बंधनकारक असतानाही या इमारतीत मेडिकल वेस्ट संकलनाची अथवा त्याची योग्य प्रकारे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही परिणामी कोविड सेंटरला बाधितांवर उपचार केल्यानंतर जमा होणारे मेडिकल वेस्ट हे सार्वजनिक ठिकाणी टाकले जात असल्याने यातून परिसरात कोरोनाविषाणू संक्रमणाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाहीचारही इमारतीच्या परिसरामध्ये व बाहेरील भागात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. इमारतीच्या आत ज्या ठिकाणी बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे, अशा ठिकाणी कुठलीही स्वच्छता नाही. सर्वत्र मेडिकल वेस्ट गोळ्यांचे रॅपर व घाण पसरली आहे. परिणामी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, या वासामुळे येथे राहणाºयांना उलट्या मळमळ असा त्रास सुरू आहे. दररोज येथे स्वच्छता अथवा साफसफाई केली जात नाही, विशेष म्हणजे शासनाने कोविड सेंटरला आवश्यक त्या सर्व सुरक्षित साधनासह स्वच्छता कर्मचाºयांची नेमणूक करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही याठिकाणी स्वच्छता कर्मचारी आढळून येत नाही. इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर घाणीचे साम्राज्य कायम आहे.