देवमोगरा पुनर्वसन गावातील क्रिकेटवेडय़ा समीरची अखंड ध्येयासक्ती
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: November 5, 2017 13:21 IST2017-11-05T13:21:54+5:302017-11-05T13:21:54+5:30
दुर्गम भागातील क्रिकेटचा नेट सराव ठरतोय कुतूहलाचा विषय

देवमोगरा पुनर्वसन गावातील क्रिकेटवेडय़ा समीरची अखंड ध्येयासक्ती
ठळक मुद्देबॅटींगमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डींगमध्ये सिलिपॉईंट आवडते..
म ोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागात दूरदर्शन पोहचायला 21 वे शतक सुरू झाल्यानंतरही अनेक वर्ष वाट पहावी लागली, त्याच परिसरात आता काही आदिवासी खेळाडू क्रिकेटच्या नेट प्रॅक्टीसने सराव करून भारताच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगू लागल्याने तो एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. देवमोगरा पुनर्वसन वसाहतीत समिर किरसिंग वसावे या ध्येयवेडा खेळाडूचा सराव परिसरासाठी लक्षवेधी ठरला आहे.क्रिकेटची आवड, देशाच्या संघात नाही तर किमान रणजी किंवा आयपीएलमध्ये निवड व्हावी ही दुर्दम्य इच्छाशक्ती सातपुडय़ातील समिर किरसिंग वसावे या क्रिकेटपटूला स्वस्थ बसू देत नाही. रात्रंदिवस केवळ क्रिकेटचा विचार करणा:या या खेळाडूने सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या त्याच्या देवमोगरा पुनर्वसन वसाहतीमध्ये सरावासाठी थेट सिमेंटचे पीच बनवून नेट बसवून घेतली आहे. सातपुडय़ाच्या आदिवासी भागात अनेक उदयोन्मूख खेळाडू आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाचा आणि खेळातील बारकावे शिकण्यासाठीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव व एकुणच न्यूनगंड यामुळे हे खेळाडू क्षमता आणि प्रतिभा असतांनाही आपले कौशल्य दाखवू शकत नाही. एखादाच किसन तडवी देशपातळीवर चमकतो. त्यातीलच समिर किरसिंग वसावे हा क्रिकेटपटू..सातपुडय़ाच्या पायथ्याशी अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावरील देवमोगरा पुनर्वसन हे त्याचे गाव. तो मुळचा नर्मदा काठावरील गमन गावाचा. बालपण तेथेच गेलेले. सरदार सरोवरातील बुडीत क्षेत्रात गाव आल्याने त्याचे कुटूंब देवमोगरा पुनर्वसन वसाहतीत स्थायिक झाले. शिक्षण घेत असतांना त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात असतांना त्याच्यातील क्रिकेटपटू तेथील क्रिडा शिक्षकांनी ओळखून त्याला अधीक प्रोत्साहन दिले. अनेक शालेय क्रिकेट स्पर्धा त्याने गाजविल्या. दहावीनंतर तो थेट महाराष्ट्राच्या 19 वर्षाआतील क्रिकेट संघात दोन वर्ष खेळला. थेट बडोदा येथील किरण मोरे क्लबमध्ये सहभागी झाला. त्याला तेथे दोन वर्ष किरण मोरे, युसूफ पठाण, इरफान पठाण यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन लाभले. त्याचकाळात रणजीसाठी निवड थोडक्यात हुकली. त्यामुळे परत शिक्षणासाठी समिर गावी आला.गावी आल्यावर क्रिकेटचा सराव थांबेल म्हणून तो नाराज झाला. वडील जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी त्याची ही तळमळ ओळखून त्याच्यासाठी आपल्या घरासमोरच उत्कृष्टप्रकारचे क्रिकेटचे पीच तयार करून दिले. मॅटमध्ये त्याला सराव करता यावा यासाठी चांगल्या प्रकारची मॅट तयार करून दिली. यामुळे समिर या ठिकाणी दररोज किमान पाच ते सहा तास सराव करू लागला. त्यासाठी त्याला गावातीलच तरुणांचे सहकार्य त्याला मिळत आहे.