पोलीसावर हल्ला करणाऱ्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:33 IST2020-09-23T12:33:27+5:302020-09-23T12:33:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे़ या कारवाईदरम्यान मोलगी ता़ अक्कलकुवा येथे ...

पोलीसावर हल्ला करणाऱ्याला कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे़ या कारवाईदरम्यान मोलगी ता़ अक्कलकुवा येथे तिघांना अडवल्याचा राग येऊन त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे़ सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोलगी पोलीस ठाण्यात ही घटना घडली़
मोलगी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश उदसिंग पाटील हे गावात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाºयांवर कारवाई करत होते़ दरम्यान मोटारसायकलवर येणाºया तिघांना त्यांनी अडवून मास्क नसल्याने जाब विचारला़ याचा राग येऊन दुचाकीस्वार रघुनाथ प्रतापसिंग वसावे रा़ मोलगी याने उलट अरेरावी करत आरडाओरड करत बाजारपेठेत पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना शिवीगाळ केली़ पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी संशयित रघुनाथ वसावे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते़ पोलीस ठाण्यात आल्यावरही संशयिताने हुल्लडबाजी सुरूच ठेवत शिविगाळ करुन राजेश पाटील यांच्या अंगावर धावून गेला़ दरम्यान त्याने पोलीस अधिकाºयाची कॉलर पकडून तोंडावर आणि छातीवर मारहाण करुन जखमी केले़ यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी तातडीने एकत्र येत संशयितास जेरबंद केले़ या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून सोमवारी याप्रकरणी संशयित रघुनाथ प्रतापसिंग वसावे याच्याविरोधात उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संशयित रघुनाथ हा ज्या दोघांसोबत दुचाकीवरून जात होते़ ते दोघे पोलीसांनी अडवल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले होते़ रघुनाथ वसावे ह्याला सोमवारीच अटक करण्यात आली होती़ मंगळवारी सकाळी त्याला अक्कलकुवा न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करत आहेत़