शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिलींगपूर येथे महिलांच्या पुढाकाराने मद्यसाठे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:48 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : व्यसनाधिनतेमुळे गावात होणारी भांडणे आणि दररोज होणा:या वादाला कंटाळलेल्या महिलांनीच दारूचे अड्डे उध्वस्त केल़े सेलींगपूर ता़ तळोदा येथे गुरूवारी सकाळी झालेल्या या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने याठिकाणी भेट देत अवैैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली़  तळोदा तालुक्यातील सेलिंगपूर येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैैध मद्य विक्री वाढल्याने व्यसनलाधिनतेचे प्रमाणही ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : व्यसनाधिनतेमुळे गावात होणारी भांडणे आणि दररोज होणा:या वादाला कंटाळलेल्या महिलांनीच दारूचे अड्डे उध्वस्त केल़े सेलींगपूर ता़ तळोदा येथे गुरूवारी सकाळी झालेल्या या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने याठिकाणी भेट देत अवैैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली़  तळोदा तालुक्यातील सेलिंगपूर येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैैध मद्य विक्री वाढल्याने व्यसनलाधिनतेचे प्रमाणही वाढले होत़े यातून वेळोवेळी किरकोळ वाद आणि भांडणे वाढीस लागत होती़ युवकांमध्ये मद्य पिऊन भानगडी वाढल्याने काही महिन्यांपूर्वी येथील महिलांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेत दारूबंदीचे निवेदन आणि तसे ठरावही दिले होत़े यानंतर गावात काहीवेळी दारूबंदी करण्यात आल्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली होती़ या प्रकाराला कंटाळलेल्या महिलांनी अशोक फत्तेसिंग ठाकरे, दिलीप मोतीराम मोरे, सुभाष भावसिंग वंजारी, गोविंदा हरसिंग ठाकरे, लोसा रूतू पाडवी, मोग्या पोहला धानका व प्रताप बाज्या पाडवी यांच्या अवैैध मद्य विक्रीच्या अड्डय़ांवर हल्लाबोल करत हातातील काठय़ांनी गावठी दारूचे मटके फोडल़े यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व इतर ग्रामस्थही होत़े महिलांच्या कारवाईनंतर मद्यविक्री करणा:यांनी येथून पळ काढला होता़ सायंकाळी उशिरा पोलीस पथकाने याठिकाणी भेट देत शांतता व सलोख ठेवण्याचे आवाहन केल़ेनवे सेलिंगपूर व जुने सेलिंगपूर येथे हातभट्टीची गावठी दारू मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याने लगतच्या गावातील मजूर सायंकाळी याठिकाणी गर्दी करत होत़े यातून गावातील शांततेचा भंग होत होता. या प्रकाराकडे लक्ष वेधत महिलांनी ग्रामसभेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी हा विषय लावून धरला होता़ यातून सरपंच रायसिंग रोडत्या मोरे, उपसरपंच रंजिताबाई दशरथ  मोरे यांनी दारू बंदीचा ठराव मंजूर करत अंमलबजावणीही सुरू केली होती़ तसेच तळोदा पोलिसात गावठी दारू विक्री करणा:यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र चोरटय़ापद्धतीने मद्य विक्री करण्याचे प्रकार सुरूच होत़े यातच मद्यविक्री बंद न झाल्याने गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आसमाबाई विजय वळवी, अनिता अश्विन पाडवी, पनीना दानेल ठाकूर, कुसुमबाई देवदान ठाकूर, कुसूम विजय राऊत, रूताबाई शिमन गार्दी नितूबाई अतुल पवार यांच्यासह 50 ते  60 महिला व ग्रामपंचायत सरपंच रायसिंग मोरे, उपसरपंच रंजिताबाई दशरथ मोरे, जीवन कामा कोळी, राजेश गुज:या पवार, दशरथ काशिराम मोरे यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थांनी हातभट्टी दारू विक्री करणा:यांच्या घरी जावून त्यांची मटकी फोडत संताप व्यक्त केला़ महिलांनी पुढाकार घेत मद्याने मटके फोडत निषेध केला़