शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कायदे असूनही महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास बळी पडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

नंदुरबार : येथील विधी महाविद्यालयात "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. या ...

नंदुरबार : येथील विधी महाविद्यालयात "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पेन देशातील संटियागो विद्यापीठाच्या प्राध्यापिका व संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रा. डॉ. अँटोनिट्टा एलिया उपस्थित होत्या. त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध संबंधित आंतरराष्ट्रीय कायदे व दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. जगात प्रत्येक देशात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदे असूनदेखील हजारो महिला लैंगिक अत्याचारास बळी पडत असतात. लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मागासलेल्या देशांमध्ये अधिक असल्याचे मत त्यांनी मांडले. दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक या मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूरच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा होत्या. त्यांनी भारतात महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू होऊन आठ वर्षे झाली मात्र आजही बहुतांश काम करणाऱ्या महिलांना त्यांना असलेल्या संरक्षणाबद्दल माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सदर उपक्रम महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. हासानी यांनी प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. लसीकरण जनजागृती स्पर्धा

महाविद्यालयातर्फे जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरणाविषयी जनजागृती प्रश्नावली स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली होती. ज्यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तराची रचना ही विद्यार्थी आणि समाजात लसीकरणाची जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांनी इतर नागरिकांना लसीकरण होण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने तयार करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी व उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, सचिव यशवंत पाटील यांनी उपक्रमासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले.