खड्डेमय रस्ते असूनही अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:57 AM2020-01-12T11:57:04+5:302020-01-12T11:57:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन ...

Despite the bumpy roads, less of an accident | खड्डेमय रस्ते असूनही अपघात कमी

खड्डेमय रस्ते असूनही अपघात कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय असूनही अपघात कमी करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ शनिवारी पालिका सभागृहात झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी. बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुधाकर चौरे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान आदी उपस्थित होते. सुरुवातीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीचे नियम व रस्त्यावरील सांकेतिक खुणा दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महेंद्र पंडित यांनी सांगितले, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या काम करावयाचे आहे. दरवर्षी जिल्ह्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा टक्के पर्यंत कमी करणे असा उद्देश आपण ठेवला आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती करणे वाहतुकीच्या नियमांचे पालन हा आहे. हेल्मेट आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी असतानाही त्याला विरोध होता कामा नये. जिल्ह्यात दरवर्षी दीडशे ते दोनशे लोक अपघातात मृत्युमुखी पडतात तर पाचशे लोक गंभीर जखमी होतात. मृत्युमुखी पडणाºयांची वयोमयार्दा २० ते ५० च्या दरम्यान आहे. सर्वाधिक अपघात दुपारी ३ ते रात्री नऊच्या दरम्यान होतात. रस्त्यावरील नियम पाळण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. उद्दिष्ठपूर्तीसाठी वाहनांवर कारवाई केली जात नाही शहरात वाहतुकीचा बेशिस्त वाहतूकपणा दिसून येतो. शिस्त लावण्यासाठी ही कारवाई होत असते. असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बच्छाव यांनी सांगितले, जिल्ह्यात २०१८ मध्ये ४९९ अपघात झाले होते ते यावर्षी ४१० पर्यंत म्हणजेच १८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील वर्षी अपघातात मृत्युमुखीची संख्या १७७ होती ती यावर्षी १५२ झाली आहे. त्यातही १४ टक्के घट आली आहे. जखमींची संख्या ३२ टक्क्यांनी कमी झाली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तर्फे विविध विभाग एकत्ररित्या काम करत असल्याने त्याचा परिणाम अपघात कमी होण्यात दिसून येतो.
जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था ही खड्डेमय असूनही आपण अपघात कमी करू शकलो आहोत. यावेळी चंद्रकांत गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी मानले.

Web Title: Despite the bumpy roads, less of an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.