अट टाकून, प्रोत्साहन देऊनही उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:08 IST2020-08-04T13:08:36+5:302020-08-04T13:08:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाणी आडवा-पाणी जिरवा याबाबत कितीही जागृती केली गेली तरी लोकांमध्ये तेवढ्यापुरतीच संवेदनशीलता असते. याचे ...

Depression despite the condition, even with encouragement | अट टाकून, प्रोत्साहन देऊनही उदासिनता

अट टाकून, प्रोत्साहन देऊनही उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाणी आडवा-पाणी जिरवा याबाबत कितीही जागृती केली गेली तरी लोकांमध्ये तेवढ्यापुरतीच संवेदनशीलता असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरं, इमारती, शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर केले जाणारे ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ दोन वर्षांपूर्वी भिषण दुष्काळाची परिस्थिती ओढावल्यानंतर याबाबतचे महत्व पटले. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला आणि पुन्हा दुर्लक्ष झाले.
नंदुरबार पालिकेने घर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाणे बांधतांनाच ही अट प्रत्येकाला घातली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी किती आणि कशी केली जाते हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. एवढेच नव्हे पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या घर किंवा दुकान मालकांना मालमत्ता करात काही प्रमाणात सूट देण्याचे देखील धोरण अवलंबले आहे, परंतु त्याचाही फायदा घेतला जात नसल्याची स्थिती आहे.
पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांना कळू लागले आहे. परंतु तरीही पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठीची मानसिकता नागरिकांमध्ये होत नसल्याचीच स्थिती आहे. पालिकेअंतर्गत बांधकाम परवाणगी घेतांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट टाकली जाते. परंतु बांधकाम परवाणगी मिळालेले निम्मे नागरिक देखील ही अट पुर्ण करीत नसल्याची स्थिती आहे. वास्तविक पालिकेने प्रोत्साहन म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात एक ते दोन टक्के सुट देखील दिलेली आहे.
घर, खाजगी इमारत किंवा सार्वजनिक इमारत बांधकाम करतांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक असते. पालिका बांधकाम परवाणगी देतांना ती अट टाकतेच. परंतु एकदाची बांधकाम परवाणगी मिळाली की कुणी अटी व शर्ती पहात नाही. पालिकेचा बांधकाम विभाग देखील नंतर परवाणगी देणाºयाच्या अटी व शर्ती तपासत नाहीत. त्यामुळे रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करणाºयांची संख्या नंदुरबारात नगण्य अशीच आहे. याबाबत पालिकेने गांभिर्याने घेवून अशा लोकांची बांधकाम परवाणगीच रद्द करावी असाही सूर उमटत आहे.

पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.
जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.
गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घरबांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशय चांगल्या आहेत.
निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.
सहज, सोपी पद्धत तसेच घरगुती स्वरूपात करता येत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सूकता आहे. यासाठी मात्र घर आणि परिसराची जागा थोडी मोठ हवी.
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी.

Web Title: Depression despite the condition, even with encouragement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.