शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनद्वारे हवाई फवारणीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे मिशन-100 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पिकांवर वेळेवर व ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे मिशन-100 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पिकांवर वेळेवर व योग्य प्रमाणात खतांची मात्रा देण्यासाठी ड्रोनद्वारे हवाई फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक  दाखविण्यात आले. ड्रोनद्वारे हवाई फवारणीचा हा प्रयोग खान्देशात सातपुडा साखर कारखान्यातर्फे प्रथमच राबविण्यात येत आहे. मेळाव्याला तालुक्यातून शेतकरी उपस्थित होते.शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या आवारात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. फवारणी करण्यात येणा:या अडचणी,  मजुरांची टंचाई यावर मात करण्यासाठी सातपुडा साखर कारखान्याने सुवर्ण महोत्सवी वर्षात कारखान्याचे संस्थापक स्व.पी.के. अण्णा पाटील यांची ‘मिशन 100’ ची स्वप्नपूर्ती करीत  ड्रोनद्वारे खतांची हवाई फवारणी करण्याचा अभिनव प्रयोग कारखान्याकडून राबविण्यात येत आहे. ऊस, केळी, पपई, कापूस आदी पिकांवर रोगकिडीचे योग्य नियंत्रण करणे, त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये व खतांची मात्रा  वेळेवर देण्यासाठी जमिनीपासून अवघ्या 20 मीटर उंचीवरून फक्त  पाच मिनिटात एक एकर क्षेत्रात ड्रोनद्वारे हवाई फवारणी करता येणार आहे. रिमोटद्वारे सुमारे 100 मीटर अंतरावरुन ड्रोनवर नियंत्रण ठेवता येते. याचे प्रात्यक्षिक परिसरातील शेतक:यांना करुन दाखविण्यात आले.  या कार्यक्रमात ऊसतज्ञ डॉ.डी.जी. हापसे, डॉ.भरत रासकर  यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, पी.के.अण्णा फाऊंडेशनचे सचिव मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील व शेतकरी उपस्थित होते.