वजनकाटा मापात तफावतची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:37+5:302021-06-27T04:20:37+5:30
शहादा येथे ग्रामीण भागातील गोरगरीब लोक बाजारासाठी येतात. मात्र ते आपले काम करून घरी परत जातात. त्यांना याबाबत कुठलीही ...

वजनकाटा मापात तफावतची चौकशी करण्याची मागणी
शहादा येथे ग्रामीण भागातील गोरगरीब लोक बाजारासाठी येतात. मात्र ते आपले काम करून घरी परत जातात. त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्यामुळे किंवा विश्वास ठेवत साहित्य, माल घेऊन जातात. याचाच गैरफायदा घेऊन विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक नुकसान करून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित वजनकाटा निरीक्षकांकडे तक्रारीसाठी ग्राहक गेले असता हे कार्यालय बंद आढळून आले. शिवाय रेशन दुकानदारांकडून शासनाच्या आदेशांचे पालन केले जात नसून दुकानाच्या बाहेर शिल्लक माल व किमतीबाबत फलक लिहिले जात नसून वेळेवर माल मिळत नाही. याबाबत संबंधितांची विचारपूस केल्यावर दमदाटी करून धमकावून अरेरावीची भाषा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुका पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाने याची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही होऊन गोरगरीब जनतेस न्याय मिळवून द्यावा. पेट्रोल पंप व गॅस सिलिंडरच्या बाबतीतही ग्राहक नाराजी व्यक्त करीत असून पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी मिळते तर गॅस सिलिंडरमधे प्रत्यक्षात दिलेल्या वजनाप्रमाणे गॅस मिळत नसल्याने ग्राहकांची फसवणूक करून आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या तक्रारींची दखल घेऊन तालुका व जिल्हा प्रशासनाने संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही होऊन गोरगरीब जनतेची फसवणूक व आर्थिकदृष्ट्या होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी मानव संरक्षण समितीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी कोमलसिंग दौलतसिंग गिरासे यांनी केली आहे.