शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी याची गुजरात हद्दीतील वाका चार रस्ता ते थेट अक्कलकुवापर्यंत अतिशय दुरवस्था झाली आहे. रत्यावर ...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ बी याची गुजरात हद्दीतील वाका चार रस्ता ते थेट अक्कलकुवापर्यंत अतिशय दुरवस्था झाली आहे. रत्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. शिवाय रस्त्याच्या साईड पट्ट्यादेखील पूर्णतः खराब झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर चार रस्तापासून हातोडा पुलापर्यंत पूर्णतः उखडला आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असते. परिणामी वाहनचालक, नागरिक अक्षरशः धुळीने माखत असतात. परिणामी त्यांना श्वसनाच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. साहजिकच रस्त्याच्या शोचनीय अवस्थेमुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. वास्तविक गेल्या वर्षी हा रस्ता दुरुस्तीबाबत बैठक घेतली होती. त्यावेळी आपण आपला प्रतिनिधी पाठवून २१ डिसेंबर २०२०ला काम सुरू करण्याचे सांगितले होते. तरीदेखील आजतागायत काम सुरू करण्यात आलेले नाही. या प्रकरणी आपल्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

या रस्त्यावरून तळोद्याबरोबरच अक्कलकुवा, धडगाव या आदिवासी तालुक्यातील नागरिक मुख्यालयाच्या ठिकाणी कामकाजासाठी जातात. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्याची आवश्यकता आहे. संबंधित ठेकेदाराने बेजाबदारपणे अजूनही दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे त्यास काळ्या यादीत टाकावे. तसा कार्यवाहीचा अहवाल इकडे पाठवावा, अशी सूचना पत्रात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. आतापर्यंत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, जनता यांनी केली असल्याचा अनुभव आहे. परंतु ठेकेदाराच्या मनमानीविरोधात चक्क महसूल प्रशासनाने मागणी केल्याने नागरिकांच्या व वाहनधारकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता काय कारवाई करतात की, नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्रालादेखील केराची टोपली दाखवतात त्याकडे उत्सुकता ताणली गेली आहे.

वाळूच्या वाहनांनाही बंदी घालावी

महसूल प्रशासनाने ज्याप्रमाणे हा रस्ता दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याचे पत्र संबंधित महामार्गाच्या अधिकऱ्यांना दिले आहे. तशीच कारवाई वाळूंच्या वाहनांवर करावी. कारण हे वाहनचालक मनमानीपणे आपली वाहने रस्त्यात उभी करून संपूर्ण वाहतुकीची कोंडी करीत असतात. शिवाय अशा अवजड वाहनांमुळेच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. त्यातच जिल्हा मुख्यालय व दवाखाना अथवा खासगी कामाकरिता येणाऱ्या लोकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच वाळूची वाहने मनमानीपणे रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असतो. अनेक वेळा रस्त्याच्या कोंडीमुळे वाहनचालक जायबंदी झाले आहेत, असे असताना ट्रकचालकांवर कारवाई केली जात नाही. एवढेच नव्हे सरकारी कर्मचारी, अधिकारीदेखील या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. त्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत असतो. निदान या वाळूच्या वाहनांवर वचक बसविण्यासाठी सक्त ताकीद द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.