शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मोठा मारुतीनजीकचे उकिरडे हटवा नंतरच स्वच्छता रँकींगच्या वल्गना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोठा मारुती मंदीर अर्थात टाऊन हॉल ते देसाईपूरा पर्यंतच्या रस्त्यावरील उकिरडे, गटारीचे पाणी, जनावरांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोठा मारुती मंदीर अर्थात टाऊन हॉल ते देसाईपूरा पर्यंतच्या रस्त्यावरील उकिरडे, गटारीचे पाणी, जनावरांचे मलमूत्र बंद करून दाखवावे व नंतरच स्वच्छ भारत अभियानात नंदुरबारची रँक वाढवल्याच्या फुशारक्या मारव्या असे आव्हान पालिकेतील विरोधी गटातर्फे सत्ताधारी गटाला करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर पालिका सभापती व नगरसेवकांची नावे गाळून त्यांचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ अभियानात नंदुरबार पालिकेला २९ वा रँक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु शहरातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य पालिकेला हटवता आलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात नंबर आल्याचा अभिमान पालिकेने तेव्हाच बाळगावा, जेव्हा मोठा मारूती मंदीर ते पुढे देसाईपुरापर्यंतच्या रस्त्यावर मैलायुक्त पाण्याचा फैलाव होणार नाही. या ठिकाणी भर रस्त्यावर उकीरडे आहेत.जनावरांच्या कचरा, मलमूत्र यातून आणि खराब पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागते. पावसाळ्यात तर नरकयातनाच भोगाव्या लागतात. याला स्वच्छता अभियानाचे यश म्हणणार काय? जागोजागी कचऱ्याचे ढिग व त्यावर मुक्तपणे गुरे ढोर, कुत्रे, वराहांचा वावर या बाबी थांबतील का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.सभापती, नगरसेवकांचा अपमानमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकांवर पालिकेच्या विषय समिती सभापतींची नावे नाहीत, नगरसेवकांची नावे नाहीत, एकमेव शिवसेनेच्या सभापती आहेत त्यांचेही नाव नाही. हा सभापती आणि नगरसेवकांचा एकप्रकारे अपमानच आहे. पालिकेचा कार्यक्रम असून या घटकांची नावे न टाकण्यामागे उद्देश काय? असा सवालही उपस्थित केला गेला आहे.नगरपालिका इमारतीला कुणी विरोध केला, त्यांची नावे जाहीर करावी. पालिकेची सत्ता वर्षानुवर्ष ताब्यात असतांना अतिक्रमण झालेच कसे असा सवालही पत्रकात भाजप नेते डॉ.रवींद्र चौधरी, गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी उपस्थित केला आहे.