गुर्जर महासभेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:03 IST2020-05-31T12:03:20+5:302020-05-31T12:03:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या पुष्कर (राजस्थान) येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन ...

गुर्जर महासभेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या पुष्कर (राजस्थान) येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी माजी अध्यक्ष स्व.रामसरण भाटी यांच्यासह समाजातील कोरोना योद्धा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी आमदार गोपीचंद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकारणी सदस्य व कोरोना साथीच्या आजारामुळे उपस्थित नसलेले सदस्यांची मते दूरध्वनीने जाणून घेतले. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केली. यावेळी एकमताने सुरेंद्रकुमार नागर, (खासदार, राज्यसभा) यांना गुर्जर महासभेचे संरक्षक बनवले गेले. राष्ट्रीय अध्यक्ष .पाटील यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची घोषणा केली.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी गोपीचंद गुर्जर, नेपालसिंग कसाना, सरचिटणीस म्हणून मुकेश गुर्जर, अहमदाबाद, बच्चूसिंह गुर्जर जयपुर, रामकिशोर दोगणे यांना मध्य प्रदेशच्या अध्यक्षांची जबाबदारी कायम करण्यात आली. यावेळी राजस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष रामप्रसाद धाबाई यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कायदा प्रकोष्ठ अॅड.रमेश धाबाई, अजमेर जिल्हा अध्यक्ष नथुलाल बजाड, अखिल भारतीय वीर गुर्जर सुधार समिती अध्यक्ष हरचंद पटेल, रामअवतार गुर्जर नसीराबाद, शिवप्रकाश खटाणा, भागचंद चोपडा, गोपालकृष्ण डोई ,गोपाल गुर्जर, जगदीप गुर्जर, किशन पंचोली, गोपाल कटारिया, नौरतम गुर्जर, गिरधारी कालस, ओमप्रकाश गुर्जर, दीपक रावत, महावीर गुर्जर, नारायण खोडवा, महावीर फौजी, भगवान सिंह खटाणा उपस्थित होते. दीपकभाई पाटील हे श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असून लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, श्री पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन, शहादा याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शहादा पंचायत समितीचे सभापती पदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. याशिवाय राज्य व जिल्हा स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थावर विविध पदे भूषवली आहेत.