नंदुरबार जिल्ह्यातील दरा धरणात बुडून तीन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:52 IST2017-08-09T17:47:02+5:302017-08-09T17:52:59+5:30

उनपदेव यथे पर्यटनासाठी गेले होते युवक

Death of three youth drowned in the dam dam in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील दरा धरणात बुडून तीन युवकांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील दरा धरणात बुडून तीन युवकांचा मृत्यू

ठळक मुद्देमयत तिघे युवक शहादा येथील रहिवासीशहाद्यातील सहा मित्र गेले होते पर्यटनासाठी उनपदेव येथेपाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.9 - उनपदेव येथे पर्यटनासाठी गेलेल्या युवकांपैकी तीन युवकांचा दरा प्रकल्पातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. तिघे युवक शहादा येथील आहेत. तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सायंकाळी उशीरार्पयत सुरू होते. चेतन नामदेव बेलदार (20), तुषार राजेंद्र अहिरराव (18) व जयेश सोनवणे (25) सर्व रा.शहादा असे मयत युवकांची नावे आहेत. बुधवारी सुटी असल्यामुळे शहाद्यातील सहा युवक पर्यटनासाठी सातपुडय़ातील उनपदेव येथे गेले होते. तेथून जवळच असलेल्या दरा धरणातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाली. इतर युवकांनी आरडाओरड केली. परंतु पाणी जास्त असल्यामुळे त्यांना वाचविता आले नाही. याबाबत म्हसावद पोलिसात सायंकाळी उशीरार्पयत नोंद झालेली नव्हती.

Web Title: Death of three youth drowned in the dam dam in Nandurbar district