शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांचा मृत्यू जखम व पतंगाच्या दोऱ्यामुळे झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

प्रकाशा येथील बॅरेज कार्यालय परिसरात चार ते पाच कावळे अचानक मृत्युमुखी पडल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त ...

प्रकाशा येथील बॅरेज कार्यालय परिसरात चार ते पाच कावळे अचानक मृत्युमुखी पडल्याचे शुक्रवारी आढळून आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. चार ते पाच कावळ्यांपैकी काही कुत्र्यांनी उचलून नेले तर दोन कावळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी गणेश धनगर यांना सापडले. त्यांनी हे मृत झालेले कावळे पुढील तपासणीसाठी शहादा येथे नेले होते. शनिवारी पशुधन विकास अधिकारी अभिषेक पेंढारकर, तालुका सहायक आयुक्त सागर परदेशी, डॉ. महेश तळेकर, डॉ. आर. के. शिंदे यांनी मृत कावळ्यांची तपासणी केली असता सांगितले की, एक कावळा जखमी होता तर दुसरा पतंगाच्या दोऱ्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिली. त्यानंतर या दोन्ही मृत कावळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. शहादा येथील पशुचिकित्सालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रकाशा येथील बॅरेज कॉलनी परिसरात येऊन पाहणी केली. या वेळी अन्यत्र कुठेही मृत्युमुखी पडलेले कावळे दिसून आले नाहीत. त्यामुळे येथे बर्ड फ्लू नाहीच, असे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, येथील बॅरेज कॉलनी व कार्यालय परिसरात घाणीचे मोठे साम्राज्य आहे. या परिसरात पाच विभागाची कार्यालये असून परिसराची स्वच्छता करण्याची गरज आहे.