वादातून एकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:27 IST2020-01-05T12:27:26+5:302020-01-05T12:27:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील एकावर चौघांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी ...

Deadly attack on one by one | वादातून एकावर प्राणघातक हल्ला

वादातून एकावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील एकावर चौघांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली होती़ हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून चौघांनी अज्ञात कारणावरुन हल्ला केल्याचे समोर आले आहे़
शहाद्यातील रविंद्र जगदीश राजपाल हा २९ डिसेंबर रोजी गंभीर जखमी अवस्थेत उनपदेव ते फत्तेपूर रस्त्यावर मिळून आला होता़ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरु असताना १ जानेवारी शुद्ध आल्यानंतर त्याने चौघांची नावे सांगून हल्ला केल्याचे म्हटले होते़ त्याची बोलण्याची स्थिती नसल्याने कारण कळू शकलेले नाही़ दरम्यान याबाबत सुनील राजपाल यांच्या फिर्यादीवरुन कैलास पवार, रमेश ऊर्फ बाळू बडगुजर, राजू कासम ऊर्फ राजू छपरी, भैय्या मोहिते सर्व रा़ शहादा यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्ह्याचे कारण अद्याप अज्ञात असून चौघांनी अज्ञात हत्याराने वार करुन रविंद्र यास गंभीर जखमी केल्याची माहिती आहे़

Web Title: Deadly attack on one by one