शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
5
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
6
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
7
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
8
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
9
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
11
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
12
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
13
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
14
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
15
सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!
16
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
17
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
18
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
19
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
20
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:51 IST

रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे.  हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे.

वाण्याविहिर (जि. नंदूरबार) : सातपुड्यातील घाटमार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अक्कलकुवा खाई ते गोरजाबारी हा तीन किलोमीटर रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे.  हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी गेल्या १५ दिवसांपासून तो गुरे डोंगरावर चरायला सोडून हाती फावडी आणि कुदळ घेत एक-एक खड्डा भरण्यासाठी मेहनत घेत आहे.

१५ दिवसांपासून सुरू आहे काम...

रायसिंग दोहऱ्या वळवी (रा. खाई) असे या ५५ वर्षीय गुराख्याचे नाव आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील खाई ते गोरजाबारी हा घाट सेक्शनचा तीन किलोमीटर रस्ता एकाबाजूने दरी आणि दुसऱ्या बाजूने उभा डोंगर असल्याने अतिशय खडतर आहे.

यातच गेल्या काही महिन्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यताही आहे. याच भागात दररोज गुरे चारणाऱ्या रायसिंग वळवी यांच्या नजरेतून प्रवाशांची होणारी फरफट सुटत नव्हती.

त्यांनी १५ दिवसांपूर्वी हाती कुदळ, फावडा घेत खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे. दररोज ते मार्गावर होईल तेवढे खड्डे भरण्याचे काम ते करत आहेत. डोंगरातून माती कोरुन आणत तिला आधी स्वच्छ करुन ते खड्डे बुजवित आहेत. हा भराव निघू नये, यासाठी ते योग्य पद्धतीने बारीक खडीही त्यात टाकतात.  

दरडींचे ढीगही हटवण्याचा मानस 

विशेष म्हणजे, या मार्गावर काही ठिकाणी डोंगरातून कोसळलेल्या दरडींचे ढिगही पडून आहेत. हे ढिगही सरकावण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्यांच्या खड्डे बुजविण्याच्या समाजोपयोगी कृतीमुळे  खाई, गोरजाबारी, ओहवा, वाडीखाडी खाडीपाडा, सावरखाडीपाडा, सरपंच पाडा, गोरजाबारीपाडा येथील वाहनधारकांना प्रवास सुखकर होत आहे. त्यामुळेच सातपुड्यातला हा ‘दशरथ मांझी’ चर्चेचा विषय झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satpuda's 'Dashrath Manjhi': Shepherd Repairs Treacherous Road Potholes Single-Handedly

Web Summary : Raising Valvi, a shepherd in Satpuda, tirelessly fills potholes on a dangerous three-kilometer stretch, using his tools to improve road conditions for villagers after authorities failed to act. His selfless work is easing travel.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक