नंदुरबार तालुक्यात मिरची व कापूस पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:57 IST2019-08-14T12:57:11+5:302019-08-14T12:57:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे ...

नंदुरबार तालुक्यात मिरची व कापूस पिकाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, लहान शहादे, सुजालपूर, विखरण, कोळदे, पळाशी, शिंदे, खोडसगाव, बामडोद, खोंडामळी या परिसरात अतिवृष्टीमुळे कापूस व मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. समशेरपूर येथे विहिरीचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.