शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

केळी पीक व शेतीपयोगी साहित्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी शिवारातील केळीची झाडे व शेतीपयोगी वस्तूंची नासधूस केल्याची घटना बुधवारी भरदुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी शिवारातील केळीची झाडे व शेतीपयोगी वस्तूंची नासधूस केल्याची घटना बुधवारी भरदुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून माथेफिरुंविरोधांचा पोलिसांनी तपास करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.ब्राह्मणपुरी येथील नारायण पहाडा पाटील यांनी आपल्या ब्राह्मणपुरी शिवारातील सर्वे नंबर ९४/१ शेतात केळीची लागवड केली आहे. बुधवारी सकाळी नारायण पहाडा पाटील यांचा मुलगा राजेश्वर पाटील हे केळीच्या शेतात पाईपलाईनजवळील ठिबक सिंचनच्या नळी दुरुस्ती करण्याचे काम करीत होते. साडे अकरा वाजेच्या दरम्यान काम आटोपून ते घरी जेवणासाठी गेले होते. जेवण करून दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास आल्यावर त्यांना शेतातील केळीची फळधारणा झालेली १५ ते २० झाडे कापून तसेच पाण्याची मोटार बंद चालू करण्याच्या फ्यूजपेटीतील कटआऊट, पाण्याचा डुग्गा, पाईप लाईन फोडून ठिबक सिंचनच्या नळ्या अस्ताव्यस्त करून नासधूस केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतपिकांचे व शेती साहित्याचे नुकसान करणाºया माथेफिरुंचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्रस्त शेतकºयांनी केली आहे.दुष्काळात तेरावा महिनासध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतमालाची विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यातच शेतकºयांचे पीक शेतात पडून असून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढे केळी पिकाला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी राबराब राबून आपले पीक जगवीत आहेत. त्यातच माथेफिरूंकडून अशाप्रकारे शेतपिकाची नासधूस होत असेल तर जगायचे कसे? असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.