शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

भांडी व दागिन्यांची मोड करून रोजचा व दवाखान्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला झाला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक गावांत शेकडो कोरोना रुग्ण ...

सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला झाला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक गावांत शेकडो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात वाढलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे अनेक गावांतील सर्व व्यवहारही ठप्प झाले असून, अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मोठा फटका बसला आहे.

त्यातच वाढती कोरोनाचे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रोजगार-धंदे ठप्प झाले आहेत.या सर्व परिस्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्या श्रमिक, कष्टकरी व सोबतच व्यावसायिकांवर आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने संकट ओढावले आले. अशात अनेक कुटुंबातील सदस्य व नातेवाइकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे रोजगार-धंदे बंद तर दुसरीकडे दैनंदिन चारितार्थ चालविण्यासाठीचा खर्च व दवाखान्याचा खर्च असे दुहेरी-तिहेरी संकट अनेक सर्वसामान्य कुटुंबांपुढे निर्माण झाले आहे.

अशा आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजच्या खर्चातून बचत करून बनविलेले दागिने व तांब्या-पितळाची भांडी अनेक जण सोनार व कासाराकडे विक्री व मोड करत असल्याचे दिसून येत आहे.

सोमवार आठवड्याचा पहिल्याच दिवशी सोनारांच्या व भांड्यांच्या दुकानात सोने, चांदी व तांब्या-पितळची भांडी विक्री व मोड करण्यासाठी आलेल्या महिलांची गर्दी दिसून आली. एका सराफा व्यावसायिकांच्या दुकानात महिलांची गर्दी पाहून थेट स्वतः तहसीलदार कारवाईसाठी दुकानात गेले. ‘कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा रोजगार-धंदा हिरावला गेला आहे. आमचे अनेक नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट आहेत. त्याच्या उपचारासाठी आम्हाला पैशांची गरज असून, सोने-चांदी मोड करण्याशिवाय सद्यस्थितीत आमच्याकडे पर्याय नाही. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आम्ही बाजारात आलो आहेत. आम्हाला आमचे दागिने विक्री करू द्या नाही, तर दुसरा पर्याय तुम्हीच सांगा,’ अशी विनंती दुकानात सोने-चांदी मोड करण्यासाठी आलेल्या महिला आदिवासी बोली भाषेत तहसीलदाराकडे करत होत्या. यावेळी बराच वेळ त्या महिला व तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली कारवाईसाठी आलेल्या महिला यांच्यात जोरदार चर्चा झाली. शेवटी सराफा व्यावसायिकाला पाचशे रुपयांचा दंड आकारणी करून, या ठिकाणी सुरू असणाऱ्या वादावर पडदा टाकण्यात आला.

दरम्यान, अशा प्रकारे अनेक जण दिवसभर सोन्या-चांदीची मोड करण्यासाठी सोनाराकडे येत आहेत, तर भांडीची विक्री करण्यासाठीही अनेक जण भांडी विक्री विक्रेत्यांच्या दुकानावर गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सोनाराकडून लोकांची हतबलता व अगतिकता आणि पैशांची गरज लक्षात घेऊन दुकाने सुरू करून त्यांचे दागिने खरेदी केली जातात. मात्र, प्रशासनाकडून दुकान सुरू केल्याने कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने नेमके करावे तरी काय, असा प्रश्न सराफा व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.

सोनारांकडे अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. अशा संकटाच्या काळात त्यांना मदत करणे हे आमचेही आम्ही कर्तव्य समजतो. काही व्यक्ती खूपच पैशांची गरज असल्याने नाईलाजाने ते दागिने विक्री करत असतात. याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन ग्राहकांना व सराफा व्यावसायिकांना दिलासा द्यावा.

आनंद सोनार, उपाध्यक्ष

तळोदा सोनार असोसिएशन