नंदुरबारात भरारी पथकाकडून दारूसह रिक्षा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:07 IST2019-03-25T11:07:23+5:302019-03-25T11:07:42+5:30

नंदुरबार : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाद्वारे अवैध गावठी दारू व रिक्षा असा ...

Dahushi rickshaw seized from Nandurbarbari Bharari squadak | नंदुरबारात भरारी पथकाकडून दारूसह रिक्षा जप्त

नंदुरबारात भरारी पथकाकडून दारूसह रिक्षा जप्त

नंदुरबार : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाद्वारे अवैध गावठी दारू व रिक्षा असा एकुण एक लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
नंदुरबार-बिलाडी रस्त्यावर संशयीत अजित मगन वळवी रा.बिजगाव हा रिक्षा घेवून जात होता. रिक्षाची तपासणी केली असता त्यात साडेपाचशे लिटर गावठी दारू आढळूनन आली.अजित वळवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक मोहन वर्दे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, प्रकाश गौडा, भूषण चौधरी, संदीप वाघ, हेमंत पाटील, हितेश जेठे, भट्टाचार्य बागले, राजेंद्र पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Dahushi rickshaw seized from Nandurbarbari Bharari squadak