मतदान यंत्राच्या स्ट्राँग रुमबाबत सामान्यांना उत्सुकता व कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:09 IST2019-05-06T12:09:30+5:302019-05-06T12:09:54+5:30
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : संबंधितांकडून वेळोवेळी आढावा

मतदान यंत्राच्या स्ट्राँग रुमबाबत सामान्यांना उत्सुकता व कुतूहल
नंदुरबार : मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात अर्थात स्ट्राँग रूम कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत. या मार्गावरून जाणारे-येणारे कुतूहलाने त्याकडे पाहत आहेत. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीचे सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे नंदुरबारातील मध्यवर्ती भागात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत. दोन गोदामांमध्ये प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ निहाय स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. याशिवाय त्रीस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. महामंडळाच्या गोदामाच्या कुंपनाच्या मुख्य गेटवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. येथे येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही त्यातून जावे लागते. सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेल्या कर्मचाºयांना वाळूने भरलेल्या पोत्यांचा आडोसा लावण्यात आला आहे. शस्त्रधारी कर्मचारी या ठिकाणी तैणात आहेत. याशिवाय नेमून दिलेले अधिकारी वेळोवेळी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची पहाणी करून घेत आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात हे गोदाम अर्थात स्ट्राँग रूम असल्यामुळे येणाºया-जाणाºयांची नजर सहाजिकच त्याकडे जाते. २३ मे रोजी होणारी मतमोजणी याच ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने देखील सोमवारपासून तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे.