‘मिशन’च्या प्रांगणात अवतरला सांस्कृतिक भारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:12 IST2020-01-25T13:12:16+5:302020-01-25T13:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस़ए़मिशन ट्रस्टअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या एज्युकेशन कार्निवलचा समारोप शुक्रवारी करण्यात आला़ कार्निवलमधून एस़ए़मिशन हायस्कूलच्या प्रांगणात ...

‘मिशन’च्या प्रांगणात अवतरला सांस्कृतिक भारत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस़ए़मिशन ट्रस्टअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या एज्युकेशन कार्निवलचा समारोप शुक्रवारी करण्यात आला़ कार्निवलमधून एस़ए़मिशन हायस्कूलच्या प्रांगणात सांस्कृतिक भारत अवतरल्याचे दिसून आले होते़
समारोपप्रसंगी डॉ़ राजकुमार पाटील, डॉ़ वृषाली पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ़ राजेश वळवी, प्राचार्या डॉ़ नूतनवर्षा वळवी, चेअरमन रेव्हरंड जे़एच़पठारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात बाला बलुतेदारी पद्धत, देशभक्तीपर गीतांवर विविध सांस्कृतिक नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यांची ओळख, हस्तकला आणि विज्ञानाधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते़ यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वनुभावातून आनंद प्राप्त केला़ एकाच छताखाली विद्यार्थ्यांना सर्व माहिती देण्याच्या या उपक्रमात पालकांनीही आनंदाने सहभाग घेत धम्माल केली़ शुक्रवारी दिवसभरात मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली़ विद्यार्थ्यांसाठी सायन्स झोनच्या माध्यमातून आंतरेंद्रीय प्रतिकृती, भौतिक, रसायन या विषयातील संकल्पना मांडण्यात आल्या़
देशभक्ती ही संकल्पलना असल्याने दोन दिवसात केजी टू ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली़