शहाद्यातील बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:16+5:302021-04-13T04:29:16+5:30

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘ब्रेक द चेन’साठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी गुरुवार ते रविवार संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले ...

Crowds at the Shahada market | शहाद्यातील बाजारात गर्दी

शहाद्यातील बाजारात गर्दी

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘ब्रेक द चेन’साठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी गुरुवार ते रविवार संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले होते. चार दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता घरातच राहणे पसंत केले. परंतु सोमवारी बाजारात खरेदीसाठी एकच झुंबड उडवली होती. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. संसर्ग कमी व्हावा, बाधीत रुग्णांची साखळी तुटावी यासाठी चार दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असला तरी मात्र लॉकडाऊन संपताच बाजारात झालेली गर्दी अनाकलनीय होती. सुज्ञ नागरिकांनी निदान खरेदीसाठी झुंबड न उडवता घरात राहणे पसंत केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास मदत होईल. दरम्यान, मंगळवारपासून चैत्र मासारंभ अर्थात मराठी नववर्षाला सुरूवात होत असल्याने गुढीपाडवा हा सण आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आपल्या पथकासह स्वतः बाजारात फिरून नागरिकांना तसेच विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत होते.

Web Title: Crowds at the Shahada market