लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतातील कचरा दुस:याच्या शेतात टाकल्याच्या कारणातून चौघांनी एकास जबर मारहाण करून हात फॅर केल्याची घटना चांदपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली. चौघांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदपूर येथील महेंद्र डाला पाडवी व करमसिंग होनजी पाडवी यांचे जवळजवळ शेत आहे. या महेंद्र पाडवी यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा खोडव्याचा कचरा करमसिंग यांच्या शेतात टाकल्याचा संशय घेत वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. करमसिंग होनजी पाडवी, राहुल मोतीराम पाडवी, सुनील मोतीराम पाडवी व दिवल्या होनजी पाडवी सर्व रा.चांदपूर यांनी महेंद्र यांना लाकडी दांडक्याने तसेच हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा हात फॅर झाला. चौघांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शिरसाठ करीत आहे.
शेतातील कच:याच्या वादातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:55 IST