शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू असून पावणेपाच कोटी रुपयांचा परतावा शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे़जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे शेतकºयांच्या कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून पॅकेज जाहिर करण्यात आले होते़ यासोबतच नऊ हजार शेतकºयांनी पिक विमा करुन घेत उत्पादनाला संरक्षण दिले होते़ गेल्या वर्षातील नुकसानीनंतर कृषी विभागाने निश्चित केलेल्या विमा कंपनीकडून दीड हजाराच्यावर पिक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले होते़ फेब्रुवारी अखेरपर्यंत हे प्रयोग सुरूच होते़ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाल्याने पिक विमा करणाºया शेतकºयांच्या परतावा देण्यासाठी होणारे कामकाज थांबले होते़ लॉॅकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर या कामाला विमा कंपनी आणि शासनाकडून वेग देण्यात आला होता़ यांतर्गत जिल्ह्यातील ३६ मंडळातील शेतकºयांना विमा रक्कम मंजूर करण्यात येऊन वितरणाचे कामकाज सुरु झाले आहे़ ही रक्कम राष्ट्रीयकृत, खाजगी आणि जिल्हा बँकेत खाती असलेल्या शेतकºयांना प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ अद्याप दोन हजाराच्या जवळपास शेतकºयांना रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती आहे़जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात जुलै अखेरपर्यंतच्या अंतिम मुदतीत २ हजार ६९४ कर्जदार तर ३ हजार ७८४ बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण सहा हजार ४८२ शेतकºयांनी एक कोटी १९ लाख ८० हजार ३२८ रुपयांचा भरणा केला होता़ यातून सात हजार ४६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते़ दरम्यान राज्य शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने तीन हजार ३१३ शेतकºयांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात चार हजार ४११ कर्जदार तर पाच हजार ३८५ बिगर कर्जदार शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला होता़ एकूण नऊ हजार ७९६ शेतकºयांनी एक कोटी ६७ लाख ३८ हजार ५२० रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़ यातून दहा हजार ३०६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ शासनाने आठ कोटी १२ लाख ५३ हजार रुपये अनुदान देत नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीकडे ३६ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला होता़ या प्रक्रियेनंतर गेल्या वर्षभरापासून शेतकºयांना विमा परताव्याची प्रतिक्षा होती़३६ महसूली मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर कृषी विभागाच्या मदतीने विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने १ हजार ८३५ पीक कापणी प्रयोग केले होते़ पिकांच्या उत्पादनाची सात वर्षांची सरासरी आणि गेल्या वर्षाचे नुकसान तपासून विमा परतावा देण्यात आला आहे़४पिक विमा कंपन्यांकडून ६ हजार ३७३ शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़ यासाठी ४ कोटी ७२ लाख ४५ हजार १७६ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे़ शेतकºयांना हरभरा, कापूस, भात, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका, बाजरी, लाल हरभरा, आजवान, ज्वारी या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला आहे़ अतीवृष्टीतील नुकसानीच्या आढाव्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यत आली आहे़धडगाव तालुक्यातील खुंटामोडी मंडळात आठ, तोरणमाळ मंडळात ६१, धडगाव ४१४,नंदुरबार तालुक्यातील आष्टे मंडळात २१०, खोंडामळी मंडळात १ हजार ४१७, नंदुरबार मंडळात ९४७, धानोरा २२, कोरीट ४३, मांडळ २६, रनाळे ४३,नवापुर तालुक्यात खांडबारा मंडळात ६१, विसरवाडी १४५, नवापुर २६१, चिंचपाडा ७१, नवागाव ६२,तळोदा मंडळात १,शहादा तालुक्यातील म्हसावद मंडळात २४३, प्रकाशा मंडळा ९२४, सारंगखेडा ४२२, मोहिदा ४, शहादा १७३, कलसाडी १अक्कलकुवा मंडळात ९५, मोरंबा २, मोलगी ७, मंडळात वडफळी ३ आदी शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़नंदुरबार तालुक्यात पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले असल्याने नंदुरबार, आष्टे व खोंडामळी मंडळात शेतकºयांची संख्या अधिक आहे़ त्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहे़