शहादा तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:00+5:302021-08-23T04:33:00+5:30

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. ...

Crop condition is critical in Shahada taluka! | शहादा तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरच!

शहादा तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरच!

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु वातावरणात बदलांमुळे पाऊस पडूनही ही पिके धोक्यात आली असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नाची हमी देणाऱ्या बागायती पिकांत विविध रोगांनी शिरकाव केल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहादा तालुक्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकऱ्यांनी आशेवर पेरणीची सुरुवात केली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसावर सर्वत्र पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके तीव्र उन्हामुळे अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यातील काही भागात होते. गत तीन दिवसात तालुक्यात पाऊस कोसळत असला तरीही पूर्ण क्षमतेने पाऊस कोसळला नसल्याने पिकांची योग्य तशी वाढ होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले होते. शेतात उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागला. परिणामी उत्पादन खर्च अधिक झाल्याने खर्चही निघाला नाही. यंदा वरुणराजा चांगला बरसेल, या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, परंतु उशिराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र आजतरी तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

n तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कडधान्य पिकांमध्ये यंदा घट

nयंदा तालुक्यात १० हजार ९७४ हेक्टर तृणधान्य तर तीन हजार ५४ हजार हेक्टरवर कडधान्यांचा पेरा आहे. ९ हजार १७९ हेक्टरवर गळीत धान्य तर ७१ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात पाऊसच न बरसल्याने कडधान्य पेरण्या अनेकांनी थांबवल्या होत्या.

nदुसरीकडे बागायती पिकांचा आढावा घेतला असताना तालुक्यात ५ हजार १९३ हेक्टरवर ऊस, ३ हजार ९४४ हेक्टरवर केळी, ४ हजार १११ हेक्टर पपई तर १ हजार ३६० हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात १५७ हेक्टरवर इतर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.

Web Title: Crop condition is critical in Shahada taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.