शिक्षक अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:16 IST2020-11-21T12:16:41+5:302020-11-21T12:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. याप्रकरणी ...

शिक्षक अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा येथील रहिवासी शिक्षक राजेंद्र मधुकर पाटील हे मूळगावाहून दुचाकी क्रमांक एमएच १९ बीएस ६९४८ ने तळोद्याकडे जात असताना मागून येणा-या एमएच २६ बीई १८६९ वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत अपघात घडवला होता. ट्रकचा वेग अधिक असल्याने दुचाकीस्वारा शिक्षक मागील चाकात ओढले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा सखाराम शिवराम शिंदे रा. डामरखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक एम.रमेश हे करत आहेत.
डामरखेडा ते प्रकाशा दरम्यान पुलापासून काहींअंतरात पुढे रस्ता खराब आहे. यातून याठिकाणी अपघात घडण्याची भिती असते तरीही अवजड वाहनचालक या मार्गाने भरधाव वेगात वाहने दामटून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतात.