विसरवाडी येथे पेट्रोलपंपावर खंडणी मागणाऱ्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:15 IST2019-03-25T11:14:52+5:302019-03-25T11:15:03+5:30

विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे हार्दिक पेट्रोल पंपावर ५०० रुपयाची मागणी करून मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ...

Crime against the people seeking ransom on a petrol pump | विसरवाडी येथे पेट्रोलपंपावर खंडणी मागणाऱ्यांविरोधात गुन्हा

विसरवाडी येथे पेट्रोलपंपावर खंडणी मागणाऱ्यांविरोधात गुन्हा

विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे हार्दिक पेट्रोल पंपावर ५०० रुपयाची मागणी करून मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी डॅनियल अविनाश वळवी रा.गताडी, बिपिन आदेश गावीत, रा़ कुंभारपाडा व आणखी एक जण हे तिघे पेट्रोल पंपावर गेले होते़ याठिकाणी त्यांनी धरमसिंग छगन गावीत यास धमकावून पाचशे रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिघा संशयितांनी धरमसिंग यास मारहाण करून धमकावले.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात धरमसिंग गावीत याच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार चंद्रकांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र जगताप, नितीन सोनवणे करत आहेत़

Web Title: Crime against the people seeking ransom on a petrol pump