विखरण येथे महिलेचा विनयभंग तरुणाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2017 12:55 IST2017-07-07T12:55:17+5:302017-07-07T12:55:17+5:30
- विखरण येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावातीलच युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

विखरण येथे महिलेचा विनयभंग तरुणाविरुद्ध गुन्हा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार , दि.7 - विखरण येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावातीलच युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी पहाटे ही घटना घडली.
विखरण येथील 21 वर्षीय महिला घरात एकटी होती. वीजपुरवठा खंडित असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास गावातीलच भटू गुलाब भिल हा महिलेचा घरात घुसला. अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केली असता भटू भिल याने तेथून पलायन केले. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भटू भिल याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.