अवजड ट्रॉला चालकाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:50 IST2019-08-20T12:50:12+5:302019-08-20T12:50:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गव्हाळी ता़ अक्कलकुवा येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणा:या ट्रॉला ...

Crime Against Heavy Trolley Driver | अवजड ट्रॉला चालकाविरोधात गुन्हा

अवजड ट्रॉला चालकाविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गव्हाळी ता़ अक्कलकुवा येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणा:या ट्रॉला चालकाविरोधात कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी संबधित चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला़ 
शक्तीवेल बी़ बोमिनेचेर रा़काराथुपुट्टी (तामिळनाडू) याने त्याच्या ताब्यातील केए 01 एई 1773 या ट्रॉलाची क्षमता ही 35 हजार किलो असताना त्यात 37 हजार 100 किलो माल भरल्याचे गव्हाळी येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर आढळून आले होत़े यावेळी संबधित आरटीओ कडून चौकशी करण्यात आली असता, चालक समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही़ अधिकच्या भारामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत असल्याने त्याच्याविरोधात मोटार वाहन निरीक्षक राहुल सदाशिव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ्करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पावरा करत आहेत़ गेल्या सहा महिन्यात गव्हाळी चेकपोस्टवरील तपासणीदरम्यान हा चौथा गुन्हा दाखल झाला आह़े 
 

Web Title: Crime Against Heavy Trolley Driver