शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून वाळू वाहतूक प्रकरणी नवापुरात १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार जिल्ह्यातून वाहतुकीला मनाई असतांनाही १३ ट्रकांद्वारे त्याची वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार जिल्ह्यातून वाहतुकीला मनाई असतांनाही १३ ट्रकांद्वारे त्याची वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला होता.गुजरातमधील वाळू नंदुरबारमार्गे नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट तर लागलीच शिवाय अपघातही वाढले आहेत. रुग्णवाहीकेचा रस्ता वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अडवून ठेवल्याचीही संतापजनक घटना घडली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातमधील वाळू नंदुरबार जिल्ह्यातून वाहतुकीला बंदी घातली आहे. असे असतांनाही नवापूरमार्गे काही वाहने जात असल्याचे लक्षात आल्यावर ती जप्त करण्यात आली होती. त्यांच्यावर अखेर दुसºया दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले.मंडळ अधिकारी नागेश चौधरी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून जुबेर हुसेन शेख, फारूख युनूस पठाण रा.औरंगाबाद, इम्रान अहमद पठाण रा.राहता, जि.अहमदनगर, इरान अयूनखान पठाण रा.खुलताबाद, शेख इशीद सलीम कुरेशी रा.दौलताबाद, शेख मुकीन पाशा नशिम पाशा रा.बीड, शेख रऊफ शेख रेहमान रा.गारखेडा, जि.औरंगाबाद, कैसरअली लीयाकत अली रा.सिडको औरंगाबाद, गणेश प्रल्हाद नालटे रा.नाशिक, ऋषीकेश चंपालाल जाधव रा.चांदवड, नाशिक. शेख रऊफ शेख रेहमान रा.औरंगाबाद व दिपक तानाजी अहिरे रा.नाशिक यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहायक पोलीस निरिक्षक शिंपी करीत आहे.