२१ दुकानदारांना न्यायालयाचा ४२ हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:03 PM2020-05-23T12:03:33+5:302020-05-23T12:03:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील अहिल्यादेवी विहिर परिसरसह जवळच्या प्रतिबंधीत भागात दुकाने उघडून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी २१ व्यापाऱ्यांवर ...

 Court fines 21 shopkeepers Rs 42,000 | २१ दुकानदारांना न्यायालयाचा ४२ हजार रुपयांचा दंड

२१ दुकानदारांना न्यायालयाचा ४२ हजार रुपयांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अहिल्यादेवी विहिर परिसरसह जवळच्या प्रतिबंधीत भागात दुकाने उघडून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी २१ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे उभे केले असता प्रत्येकाला दोन हजार रुपये दंड देण्यात आला. २१ जणांना एकुण ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नंदुरबारातील अहिल्यादेवी विहिर परिसरात कोरोनाबाधीत रुग्ण आढळला होता. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येवून बॅरीकेटींग करण्यात आले होते. परंतु १९ मे रोजी या भागातील दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
त्यात विनोद मंदाणा, विक्रम बजाज, सतिष माळी, गोपाळ बागले, हर्षल परदेशी, अनील वासवाणी, शंकर मंदाणा, आनंद गिफ्ट हाऊस, राम गुरुबक्षाणी, अशोक जैन, बालाजी साडी, शंकर तररेजा, रोहित गेही, आदेश सोपुरे, दलपतसिंह राजपूत, गुलाबसिंह राजपूत, मोदी हॅण्डलूम, अंबर मॅचींग, अरिहंत कलेक्शन, सिद्धार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन, कुंदन कटारिया, सोनलकुमार वाणी, विशाल शिंदे, गौतमचंद जैन, सिद्धार्थ जैन, सुनील देसरडा व शैलेंद्र जैन यांचा त्यात समावेश होता.
त्यांना नंदुरबार येथील प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी एस.ए.विराणी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येक दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

Web Title:  Court fines 21 shopkeepers Rs 42,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.