बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:54 PM2020-02-16T12:54:43+5:302020-02-16T12:54:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथे बनावट देशी दारू बनविण्याचा कारखानावर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने धाड ...

Counterfeit alcohol manufacturing factory | बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्धवस्त

बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्धवस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथे बनावट देशी दारू बनविण्याचा कारखानावर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने धाड टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. एकास अटक करण्यात आली असून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन प्रकाश यादव (३२) रा.वाण्याविहिर, ता.अक्कलकुवा असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. वाण्याविहिर येथे बनावट दारू बनविली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथक गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पाळत ठेवून होते. शुक्रवार १४ रोजी रात्री आठ वाजता अंधारात ही कारवाई करण्यात आली. वाण्याविहिर येथील संशयीताच्या घराच्या आजूबाजुला साध्या वेशातील पथकातील सदस्यांनी घेरले. पडक्या जागेवरील झोपडीत काचेच्या बाटल्यांचा आवाज आल्यावर खात्री झाल्यानंतर धाड टाकण्यात आली. यावेळी चाहूल लागताच संशयीत सचिन प्रकाश यादव याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्यास जेरबंद केले.
या ठिकाणाहून ३९ हजार ९३६ रुपयांची बनावट देशी टँगोपंच दारूच्या ७६८ बाटल्या.६० हजार रुपये किंमतीचे दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट, ३३,५०० रुपये किंमतीची १०० लिटर बनावट देशी दारू, १० हजार रुपये किंमतीचे बाटल्या सिलबंद करण्यासाठी लागणारे मशीन, एक हजार रुपये किंमतीचे अल्कहोल मोजण्याचे मशीन व चार हजार २०० रुपयांचे बूच, लेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सचिन यादव याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार मुकेश तावडे, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली.

Web Title: Counterfeit alcohol manufacturing factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.