पाण्याअभावी कापसाचे पिक धोक्यात : नंदुरबार तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:10 IST2018-11-13T12:09:59+5:302018-11-13T12:10:06+5:30

वेळेपूर्वीच कापूस वेचणीची कामे आटोपली

Cottonseed crop risk due to water: Nandurbar taluka | पाण्याअभावी कापसाचे पिक धोक्यात : नंदुरबार तालुका

पाण्याअभावी कापसाचे पिक धोक्यात : नंदुरबार तालुका

लहान शहादे : यंदा तालुक्यात पावसाने पाठ फिरवली होती़ त्यामुळे साहजिकच पाण्याअभावी कापूस पिक संकटात आले आह़े बोंड  कमी फुटल्याने यंदा कापूस वेचणीची कामे वेळे आधीच आटोपली आह़े शेतक:यांकडून कापसाच्या काडय़ा काढणीची कामे सुरु झाली आहेत़ 
तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आह़े जेमतेम 67 टक्के इतकाच पाऊस झाल्याने कापसासह विविध पिक धोक्यात आली आहेत़ त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या़ 
त्यामुळे शेतक:यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणा:या कापूस पिकाचा हंगाम आटोपता घ्यावा लागला आह़े यंदा तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणात कापसाचा पेरा केला होता़ परंतु अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतक:यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल़े 
बागायतदार शेतक:यांचे कापूस पिक पाण्याअभावी कोरडे होऊन वाढ खुंटली आह़े तर तालुक्यातील कोरडवाहू शेतक:यांचे पहिल्या वेचणीतच कापसाचे क्षेत्र रिकामे झाले आह़े ट्रक्टरव्दारे कापसाच्या काडय़ा काढण्याचे कामे करताना कापूस उत्पादक शेतकरी दिसून येत आहेत़ दरम्यान, कापूस वेचणीची कामे वेळे आधीच आटोपली गेली असल्याने या ठिकाणी मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे स्थानिक मजुरांकडून सांगण्यात आले आह़े आधीच या तालुक्यातून मोठय़ा संख्येने मजुरांचे स्थलांतर झाले आह़े त्यात उरला-सुरला रोजगारही हातून गेला असल्याने येथील मजूर स्थलांतराच्या तयारीत आहेत़ दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतक:यांची मोठी पिळवणूक होत आह़े परतीच्या पावसानेही निराशा केल्याने यंदा कापसाच्या उत्पन्नातही घट संभवत़े
 

Web Title: Cottonseed crop risk due to water: Nandurbar taluka