कापूस चोरी करणा-याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:54 IST2020-11-06T12:54:39+5:302020-11-06T12:54:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील मेघमल्हार सिटीत बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. २ ...

कापूस चोरी करणा-याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील मेघमल्हार सिटीत बंद घरात ठेवलेला कापूस चाेरीला गेल्याची घटना घडली होती. २ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी अवघ्या काही २४ तासांच्या आत चोरट्यास अटक केली आहे.
सोमनाथ महादेव खैरनार रा. मेघमल्हार सिटी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी त्याच्याकडून ३ क्विंटल कापूस जप्त केला आहे. महेंद्र ताराचंद शिरसाठ यांनी त्यांच्या शेतातील काढलेला ६१ हजार रूपयांचा १२ क्विंटल कापूस गिरीष दिक्षीत यांच्या मेघमल्हार सिटीतील घरात ठेवला होता. दरम्यान २ रोजी पहाटेच्या सुमारास हा कापूस चोरीला गेला होता. चोरीच्या या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास सुरू केला होता. दरम्यान मेघमल्हार सिटीतच राहणा-या सोमनाथ खैरनार याला ताब्यात घेत त्याची चाैकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ क्विंटल कापूस जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील बि-हाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोलीस काॅन्स्टेबल रविंद्र पवार, जगदीश पवार, संदीप गोसावी, भटू धनगर, अफसर शाह, इम्रान खाटीक, कल्पेश रामटेके, विजय नागोडे, अनिल बडे, हेमंत बारी यांच्या पथकाने केली.