नंदुरबारात कापूस खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:00 IST2020-05-02T12:00:24+5:302020-05-02T12:00:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येथील कापूस खरेदी केंद्रावर अखेर सीसीआयमार्फत कापूस खरेदीस गुरुवारपासून सुुरुवात झाली. पहिल्या दिवशी २० ...

Cotton shopping center started in Nandurbar | नंदुरबारात कापूस खरेदी केंद्र सुरू

नंदुरबारात कापूस खरेदी केंद्र सुरू


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येथील कापूस खरेदी केंद्रावर अखेर सीसीआयमार्फत कापूस खरेदीस गुरुवारपासून सुुरुवात झाली. पहिल्या दिवशी २० वाहनांद्वारे ५०० क्विंटल खरेदी झाली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दररोज किमान ३० वाहनांमधील कापूस या ठिकाणी खरेदी केला जाणार आहे.
मार्च महिन्यात सीसीआयने अचानक २० दिवस कापूस खरेदी बंद ठेवली होती. त्यानंतर जेमतेम खरेदी सुरू होताच लागलीच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून राहिला. कापूस विक्री होतो की नाही या विवंचनेत असलेला शेतकºयांना शासनाने दिलासा देत गुरुवार ३० एप्रिलपासून पुन्हा खरेदीला सुरुवात केली. नंदुरबार बाजार समितीच्या स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात सीसीआयमार्फत ही खरेदी सुरू आहे.
बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांच्या हस्ते तसेच संचालक डॉ.सयाजी मोरे, भरत पाटील, सीसीआयचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे, अशोक चौधरी, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर आदींच्या उपस्थितीत झाले.
तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त यादीनुसार दररोज किमान ३० शेतकºयांना बाजार समितीकडून संपर्क केल्यानंतर तारीख दिली जाईल. त्या तारखेलाच शेतकºयांनी कापूस आणावा.
आतापर्यंत जवळपास १२०० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. दररोज नियमाप्रमाणे ३० वाहने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी यावेळी दिली.


 

Web Title: Cotton shopping center started in Nandurbar